सात वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST2021-09-13T04:11:44+5:302021-09-13T04:11:44+5:30

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील एका गावातील सात वर्षाच्या बालिकेवर २० वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची अशाल्घ्य घटना ११ सप्टेंबर ...

Excess on a seven-year-old girl | सात वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग

सात वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील एका गावातील सात वर्षाच्या बालिकेवर २० वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची अशाल्घ्य घटना ११ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी पिडिताच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तक्रारीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी एक कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी शेतमजुरीला गेले होते. ते आपल्या लहान मुला-मुलीला आजी-आजोबाकडे घरीच ठेवून गेले होते. दरम्यान, ती बालिका सकाळी ९.३० च्या सुमारास शौचासाठी गावातील नाल्याच्या बाजूला गेली. संशयित आरोपी शिवम पातोंड (२०) याने तिला मोटर सायकलवर बसवून काही अंतरावर असलेल्या कपाशीच्या शेतातील निंबाच्या झाडाखाली नेले. तिच्यावर बळजबरी केली. आई-वडील शेतातून घरी आले असता, मुलगी रडत असल्याची दिसली. आपबिती ऐकून घेतल्यानंतर मुलीच्या आईकडून रहिमापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यातक्रारीवरून, बालिकेला बळजबरीने पळवून नेणे, शारीरिक अत्याचार, पोक्सो व ॲट्राॅसिटी कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

बॉक्स

रात्री गुन्हा दाखलरहिमापूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तकार दिल्यानंतर ठाणेदार यांनी तत्काळ गुन्ह्याची दखल घेऊन घटनास्थळी पंचनामा केला. तथा रात्री ११.२५ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला. संबंधित आरोपीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती रहिमापूरचे ठाणेदार सचिन इंगळे यांनी दिली.

Web Title: Excess on a seven-year-old girl