बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या प्रवेशित कॉलेजमध्येच परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:11 IST2021-04-05T04:11:49+5:302021-04-05T04:11:49+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या सम सत्राच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा प्रवेशित कॉलेजमध्ये होणार ...

बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या प्रवेशित कॉलेजमध्येच परीक्षा
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या सम सत्राच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा प्रवेशित कॉलेजमध्ये होणार आहे. ७ ते १२ एप्रिल दरम्यान परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
एमसीक्यू पद्धतीने या परीक्षा होणार आहे. अभ्यासक्रमातील गुणांनुसार ६० अनुपादात गुण विद्यर्थ्यांना दिले जातील, अशी नियमावली आहे. बॅकलॉग विद्यार्थी जिथे प्रवेशित आहे, त्याच महाविद्यालयात त्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. पाचही जिल्ह्यांतून १२,५०० बॅकलॉगचे विद्यार्थी असून हॉल तिकीट, कंट्रोल शीट, राेल नंबर आदी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठात हार्ड कॉपीदेखील उपलब्ध असून, महाविद्यालयांना ती नेता येणार आहे. तसेच लर्निंग स्पायरल एजन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा कॉलेज लॉगीनमधून होणार आहे. बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना ४० पैकी २० प्रश्न सोडवावे लागणार आहे.
महाविद्यालयांनाच प्रश्नपत्रिका तयार करायच्या असून, प्रचलित पद्धतीने विद्यापीठात गुण पाठवावे लागणार आहे. पेपर सेट महाविद्यालयांना तयार करावे लागतील. ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने बॅकलॉग विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. महाविद्यालयाने कोणत्या प्रकारची प्रश्नपत्रिका काढली त्याची प्रत विद्यापीठाला पाठवावी लागेल. अन्यथा त्या महाविद्यालयांचे निकाल जाहीर होणार नाही, अशी अट लादण्यात आली आहे.
--------------
कोट
हिवाळी २०२० बॅकलॉग परीक्षांचे नियोजन महाविद्यालय स्तरावर होणार आहे, बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या महाविद्यालयातून अर्ज भरला त्याच महाविद्यालयात परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा आटोपल्यानंतर प्रचलित पद्धतीने गुण पाठवायचे आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ