धामणगावात साडेतीनशे रूग्णांची तपासणी

By Admin | Updated: July 11, 2016 00:10 IST2016-07-11T00:10:12+5:302016-07-11T00:10:12+5:30

तालुक्यातील गरजू रूग्णांना मोफत आरोग्यसेवा मिळावी म्हणून स्व़ओमप्रकाश चांडक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित आरोग्य तपासणीत साडेतीनशे रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे़

Examination of three and three patients in Dhamanga | धामणगावात साडेतीनशे रूग्णांची तपासणी

धामणगावात साडेतीनशे रूग्णांची तपासणी

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील गरजू रूग्णांना मोफत आरोग्यसेवा मिळावी म्हणून स्व़ओमप्रकाश चांडक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित आरोग्य तपासणीत साडेतीनशे रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे़
येथील माहेश्वरी भवनात आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी आ़वीरेंद्र जगताप, प्रमुख अतिथी म्हणून अनुप सारडा, ओमप्रकाश मुंधडा, शुभांगी मुंधडा, गणेश मुंधडा, सोहन लोहीया, सांकेत मुंधडा, सचिन अग्रवाल यांची उपस्थिती होती़
ग्रामीण भागातील रूग्णांना मोफत आरोग्य तपासणीच्या माध्यमातून आरोग्य सेवा निर्माण करून देणे हीच ईश्वरसेवा असून युवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामाजिक सेवेकडे लक्ष देण्याचे आवाहन आ़ जगताप यांनी केले़ या शिबिरात तालुक्यातील रूग्णांनी हृदयरोग, मूत्ररोग, चर्मरोग, नेत्र, अस्थी विविध रोगांची तपासणी करून घेतली़ संचालन मनीष मुंधडा, तर आभार प्रदर्शन प्रितम चांडक यांनी केले़ शिबिराकरिता वैद्यकीय अधिकारी, प्रकाश राठी, अशोक भैय्या, अशोक सकलेचा, शोभा राठी, सारिका सकलेचा, भरत पालीवाल यांनी परिश्रम घेतले़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Examination of three and three patients in Dhamanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.