रुग्णांचे रक्त नमुने तपासणीला
By Admin | Updated: August 13, 2014 23:35 IST2014-08-13T23:35:43+5:302014-08-13T23:35:43+5:30
चांदूरबाजार तालुक्यात कोदोरी गावातील डेंग्यू सदृश रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

रुग्णांचे रक्त नमुने तपासणीला
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटी : कोदोरीत डेंग्यू सदृश आजार आटोक्यात
अमरावती : चांदूरबाजार तालुक्यात कोदोरी गावातील डेंग्यू सदृश रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
२६८ लोकसंख्येच्या कोदोरी गावात अनेकांना तापाची लागण झाली. यातील पाच रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना अमरावती, चांदूरबाजार व परतवाड्याच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. अचानक कोदोरी गावात तापीचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, सहायक आरोग्य अधिकारी चऱ्हाटे यांच्या नेतृत्त्वातील आरोग्य पथक मंगळवारी कोदोरी गावात दाखल झाले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी गृहभेटी दिल्या असता पुन्हा तापीचे चार रुग्ण आढळून आले. या रुग्णांचा औषधोपचार व रक्ताचे नमुने घेण्यात आले. तसेच चांदूरबाजार, परतवाडा व अमरावतीच्या रुग्णालयात दाखल रुग्णांचेही रक्त नमूने घेऊन आज बुधवारी सकाळीच हे नमूने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गुरुवारी दुपारपर्यंत रक्त नमून्याचा अहवाल अमरावतीच्या आरोग्य विभागाला मिळण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली.