दरवर्षी पाच लाख पर्यटक अमरावती जिल्ह्यात

By Admin | Updated: June 26, 2015 00:33 IST2015-06-26T00:33:18+5:302015-06-26T00:33:58+5:30

निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी ५ लाखांवर पर्यटक अमरावती जिल्ह्यात येतात.

Every year, five lakh tourists visit Amravati district | दरवर्षी पाच लाख पर्यटक अमरावती जिल्ह्यात

दरवर्षी पाच लाख पर्यटक अमरावती जिल्ह्यात

वैभव बाबरेकर अमरावती
निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी ५ लाखांवर पर्यटक अमरावती जिल्ह्यात येतात. साधारणत: हिवाळा व पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात अमरावती जिल्हा सर्व दृष्टीने समृध्द आहे. जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरण व धार्मिक स्थळे पाहण्याकरिता देशा-विदेशातूनही पर्यटक अमरावती जिल्ह्यात येतात. साधारणत: पावसाळ्यापासून पर्यटकांची धूम जिल्ह्यातील विविध ठिकाणी पहायला मिळते. विदर्भातील नंदनवन असणारे मेळघाट व चिखलदरा थंड हवेचे ठिकाणी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे. त्यामुळे दरवर्षीच चिखलदरा व मेळघाटात पर्यटकांची मोठी गर्दी राहते. पाऊस पडताच निसर्गरम्य वातारवण पाहण्यासारखे असते. त्यातच पावसामुळे जलस्त्रोत तुंडूब भरतात. अशावेळी नद्याही ओसंडून वाहू लागतात.
त्यातच धबधब्यांची दृश्ये पाहण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. चिखलदऱ्यातील हील स्टेशन, पंचबोल पॉइंन्ट, गावीलगड, देवी पॉइंट, नरनाळा अभयारण्य, गुगामल नॅशनल पार्क, वाण अभयारण्य, मेळघाट टायगर रिजर्व्ह, सेमाहोड, कोलकास अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे.
दरवर्षी सुमारे ५ लाखांवर पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर येत असून लाखोंचा महसूलसुध्दा प्रशासनाच्या तिजोरीत जमा होत आहे.
धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी
जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये मुख्यत: अमरावती शहरातील अंबादेवी व एकवीरा देवीचे मंदिर आहे. दरवर्षी देशभरातून अनेक भाविक तेथे दर्शनासाठी येतात. त्यातच आमनेर महादेव मंदिर, बहिरम, इस्कॉन मंदिर, सतीधाम मंदिर, वैराग्य देवी मंदिर असे अनेक धार्मिळ स्थळांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळते.
मुक्तागिरीचे मंदिर विशेष आकर्षण
अमरावती जिल्ह्याच्या शेजारीच मध्य प्रदेशात मुक्तागिरीचे भव्यदिव्य मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरण वसलेले हे जैन मंदिर विदर्भातील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. मुक्तागिरी मंदिरात जाण्यासाठी बहुतांश पर्यटकांना अमरावती जिल्ह्यातूनच जावे लागते. त्यामुळे महाराष्ट्रातही मुक्तागिरी धार्मिक स्थळ नामाकिं त आहे. दरवर्षी जिल्ह्यातील हजारो नागरिक मुक्तागिरीला जात असल्याचे पर्यटकांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Every year, five lakh tourists visit Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.