अखेर वसतिगृह अधीक्षक निलंबित
By Admin | Updated: August 16, 2016 23:55 IST2016-08-16T23:55:05+5:302016-08-16T23:55:05+5:30
प्रथमेश हल्लाप्रकरणी जिल्हा समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी वसतिगृह अधीक्षक दिलीप मौजे याला अखेर निलंबित केले.

अखेर वसतिगृह अधीक्षक निलंबित
अमरावती : प्रथमेश हल्लाप्रकरणी जिल्हा समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी वसतिगृह अधीक्षक दिलीप मौजे याला अखेर निलंबित केले.
‘लोकमत’ने प्रकरण उघडकीस आणल्यानंतर समाजकल्याण खात्याने चौकशी आरंभली होती. द्विसदस्यीय चौकशी समितीने वसतिगृह आणि आश्रम परिसरात जाऊन सुरू केलेली चौकशी अद्यापही पूर्ण व्हायची आहे. तथापि गुन्हा लपविण्याची कुठलीही संधी मिळू नये यासाठी अधीक्षकाला तत्काळ प्रभावाने शनिवारी रात्री निलंबित करण्यात आले. चौकशी पूर्ण होईस्तोवर अधीक्षक निलंबित राहिल. चौकशीत आणखी काय काय बाहेर येते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.