अखेर पाथरगाव उपसा सिंचनाचे काम लागले मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:21+5:302021-04-10T04:12:21+5:30

वीरेंद्र जगताप यांचे प्रयत्न : ५० कोटी रुपयांची तरतूद चांदूर रेल्वे : तालुक्यातील पाथरगाव उपसा सिंचन योजनेच्या कामाला निधी ...

Eventually Pathargaon Upsa Irrigation work started | अखेर पाथरगाव उपसा सिंचनाचे काम लागले मार्गी

अखेर पाथरगाव उपसा सिंचनाचे काम लागले मार्गी

वीरेंद्र जगताप यांचे प्रयत्न : ५० कोटी रुपयांची तरतूद

चांदूर रेल्वे : तालुक्यातील पाथरगाव उपसा सिंचन योजनेच्या कामाला निधी प्राप्त होऊन त्याची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली. पुढील काही वर्षांत स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

तालुक्यातील आमला विश्वेश्वर हे गाव शेतीप्रधान व त्यात संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. परंतु अनेक वर्षांपासून गावातील पाणीसाठा आटल्याने परिसरात पाण्याचा प्रचंड दुष्काळ पडला आहे. गावातील नागरिकांना व शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी आमला ग्रामवासीयांनी पाथरगाव उपसा सिंचनाची मागणी रेटून धरली होती. त्यात भगवान वाघ व अशोक वाढोनकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता. २००९ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. परंतु बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला नव्हता. तब्बल १० वर्षांनंतर वीरेंद्र जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे सन २०१९ मध्ये या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळून ५५ कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले. परंतु, कोरोनामुळे पुढील प्रक्रिया संथगतीने सुरू होती. कधी जागेची अडचण तर कधी इतर प्रशासकीय बाबी यात ही योजना अडकली होती. आता त्यासाठी नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

-------------------

Web Title: Eventually Pathargaon Upsa Irrigation work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.