अखेर अलउमर जिनिंग प्रेसिंगचा परवाना होणार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:40+5:302021-03-23T04:14:40+5:30
अंजनगाव सुर्जी : अकोट तालुक्यातील चार कापूस ऊत्पादकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अलउमर जिनिंग प्रेसिंगचा परवाना होणार रद्द केला जाणार ...

अखेर अलउमर जिनिंग प्रेसिंगचा परवाना होणार रद्द
अंजनगाव सुर्जी : अकोट तालुक्यातील चार कापूस ऊत्पादकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अलउमर जिनिंग प्रेसिंगचा परवाना होणार रद्द केला जाणार आहे. स्थानिक बाजार समितीने सर्वानुमते तसा ठराव केला.
अंजनगाव एमआयडीसी परिसरातील अलउमर जिनिंग प्रेसिंगच्या मालकाने रक्कम तर दिलीच नाहीच, उलट कापून टाकण्याची धमकी दिली. त्या शेतकऱ्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत संबंधित जिनिंग प्रेसिंगच्या मालकाला १० मार्च रोजी बाजार समितीत वादाचा निपटारा करण्यासाठी बोलावले. मात्र, तो सभेला हजर राहिला नाही. तेव्हा संचालक मंडळाने रितसर ठराव घेऊन पोलिसांत तक्रार दिली. शिवाय जिनिंगने ६० हजार रुपयांचा सेसदेखील भरला नाही. त्यामुळे बाजार समितीने २१ मार्च रोजी झालेल्या मासिक सभेत अलउमर जिनिंग प्रेसिंगचा परवाना रद्द करण्याचा ठराव घेतला असून, जिनिंग सील करण्याचाही कारवाई केली जाणार आहे.
अकोट तालुक्यातील मालती गजानन घोडेस्वार यांचे १ लाख ९७ हजार ६४० रुपये, मतीनखान जलील खान यांचे ४ लाख ११ हजार ६७० रुपये, मनोज गजानन झुमे यांचे १ लाख ८८ हजार ८३० रुपये, पुरुषोत्तम माधव मोहकार २ लाख १२ हजार २३० रुपयांचा कापुस घेवुन त्यांना तितक्या रकमेचे धनादेश दिले असता, त्यांनी ते धनादेश वटवण्याकरीता बँकेत दिले. मात्र पुरेशी रक्कम खात्यात नसल्याने अनादरित झाले. शेतक ºयांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत जीवे मारण्याची धमकी दिल्याने शेतकºयांनी तक्रार दिली होती. मासिक सभेत सभेत ठराव घेऊन त्या जिनींगची अनुज्ञाप्ती रद्द करून लवकरच जिनिंगला सील लावण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती सचिव गजानन नवघरे यांनी दिली.