उन्हाळ्याच्या सुटीतही मुलांचा कोंडमारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST2021-05-27T04:13:34+5:302021-05-27T04:13:34+5:30
अमरावती : दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर मुलांना वेध लागतात गावी जाण्याचे, बाहेर फिरण्याचे. अभ्यासाचे टेन्शन नाही. दररोज दिवस मजेत घालवायचा. ...

उन्हाळ्याच्या सुटीतही मुलांचा कोंडमारा
अमरावती : दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर मुलांना वेध लागतात गावी जाण्याचे, बाहेर फिरण्याचे. अभ्यासाचे टेन्शन नाही. दररोज दिवस मजेत घालवायचा. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे गत वर्षीपासून मुलांचे जीवन बंदिस्त झाले आहे. यंदाही काही वेगळी परिस्थिती नसल्याने सलग दुसऱ्या वर्षी मुलांची सुट्टी घरातच जात आहे.
कोरोनामुळे परीक्षा रद्द झाले आहेत. आता मे महिन्याची सुट्टी लागली आहे. त्यामुळे आता अभ्यास नाही. पण लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर खेळता येत नाही. कोरोना असल्यामुळे पालक मुलांना बाहेर खेळायलाही पाठवीत नाही. त्यामुळे मुले घरात बसून चिडचिड होत आहेत. घरात बसून मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडत चालले आहे. शाळा होती तेव्हा थोडेतरी खेळणे व्हायचे. पण आता बाहेर पडायची नसल्यामुळे काही मुले आळशीदेखील बनत आहे. त्या स्थितीत मुलांना विरंगुळा मिळावा तसेच त्यांच्यातील कला देखील जपली जावी या उद्देशाने काही शाळा आणि संस्था या ऑनलाईन समर कॅम्प ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर वर्ग, चित्रकला घोषवाक्य स्पर्धा, अशा स्पर्धाच घेतात. तसेच रांगोळी, मेहंदी टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू कशा बनवायचे याचे युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून मुलांना पालकच घरी शिकवित आहेत. मुले ते पाहून घरी सराव करतात .घरात बंदिस्त झालेल्या मुलांना जर त्यांच्या आवडीच्या निर्माण व्हावे याकरीता नवनवीन शिकविण्याचा प्रयत्न पालकांकडून किंवा संबंधित विषयाच्या शिक्षकांकडून ऑनलाईन शिकविण्या प्रयत्न केला जात आहे.
कोट
दरवर्षी आम्ही वर्षातून दोन वेळा तरी सुट्टीसाठी गावी जात असतो. मात्र कोरोनामुळे सुट्या घरात जात आहेत. मोठी माणसे परिस्थितीला समजू शकतात. पण मुलांच्या आयुष्यात काहीच बदल नाही. कुठे फिरायला जाणे सोडा बाहेर खेळायला ही जाता येत नाही .त्यामुळे ती फार वैतागली आहे.
- मंजुषा गावंडे,
पालक