चिरोडी जंगलातही पेटला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST2021-02-27T04:15:20+5:302021-02-27T04:15:20+5:30

एक हेक्टर जंगल जळून खाक : लालखेड बीटचे नुकसान पोहरा बंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील ...

Even in the Chirodi forest | चिरोडी जंगलातही पेटला वणवा

चिरोडी जंगलातही पेटला वणवा

एक हेक्टर जंगल जळून खाक : लालखेड बीटचे नुकसान

पोहरा बंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील मालखेड बीट वनखंड क्रमांक ३१७ मध्ये मंगळवारी वणवा पेटला. या वणव्यात एक हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली. हल्ली हिवाळ्यात आगीच्या घटना उघडकीस आल्यामुळे वनप्रशासनात चिंता व्यक्त आहे.

चिरोडी वर्तुुळातील जंगलात मागील वर्षी उन्हाळ्यात चार महिने फार कमी आगी लागण्याच्या घटनेची नोंद वनविभागात आहे. या वर्षी या जंगलात उन्हाळा लागताच आग लागण्यास प्रारंभ झाला आहे. मंगळवारी लालखेड बीटमधील आगीची ही पहिलीच घटना घडली असून, या आगीत जंगलातील झाडे-झुडपे, गवत आणि मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली. दुपारी ४ वाजता लागलेली ही आग नियंत्रणात आणण्यासाठी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखालील चिरोडी वर्तूळ अधिकारी राजन हिवराळे, वनरक्षक दीपा बेलाह, गोविंद पवार, राहून कैकाडे, अश्विन महल्ले, अतुल धस्कट, वनमजूर विनायक लोणारे, रामू तिडके, शालिक पवार, रफिक शेख, रामू चव्हाण, संरक्षण मजूर प्रमोद राठोड यांनी ब्लोअर मशीनचा वापर करून ही आग भडकण्यापूर्वीच आटोक्यात आणली.

Web Title: Even in the Chirodi forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.