शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अतिशिकस्त इमारतींमधील माणसे काढा, महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

By प्रदीप भाकरे | Updated: October 31, 2022 16:48 IST

मॅराथॉन बैठक, प्रभात चौकातील 'त्या' तीन दुकानांना सील

अमरावती : प्रभातचौक स्थित राजेंद्र लॉजची दुमजली अतिशिकस्त इमारती पडून त्याखाली पाच जण जीवंत गाडले गेले. त्याप्रकरणी राजदिप बॅग या प्रतिष्टानच्या मालकांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्याअनुषंगाने तातडीने शहर गाठत महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांची मॅराथॉन बैठक घेतली. त्यात सीवन वर्गवारीतील एकुण ३३ अतिशिकस्त इमारती तातडीने मनुष्यविरहित करण्याचे निर्देश दिले. पैकी पाच अतिशिकस्त इमारतींमध्ये अद्यापही भाडेकरू वा मालक राहत असल्याची माहिती उपअभियंत्यांकडून देण्यात आली. तत्पुर्वी सकाळी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळाची पाहणी केली.

न्यायालयाकडे दाखल असलेली प्रकरणे संपुर्ण तपासून त्याप्रमाणे निर्णय घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. झोन क्र. २ मध्ये सर्वाधिक शिकस्त इमारती असल्याचे बैठकीदरम्यान समोर आले. सबब, संबंधित झोनचे सहायक आयुक्त, उपअभियंता व कनिष्ट अभियंत्यांना सुचना देण्यात आल्या. पाचही सहायक आयुक्तांसह शहर अभियंता व त्यांच्या अधिनिस्थ यंत्रणेकडे अतिशिकस्त इमारतींच्या वास्तव स्थितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २६५ अ अन्वये ज्या इमारतीच्या बांधकामास ३० वर्ष पुर्ण झाली आहेत, अशा इमारतीचे तज्ञ संस्थे वा व्यक्तीमार्फत संरचनात्मक परिक्षण होणे अनिवार्य आहे. तथापि, मालक / भोगवटदारांनी त्यासंबंधी कोणतीही दखल घेतली नाही. सबब, ज्या इमारतींना तीस वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा सर्व निवासी किंवा अनिवासी वापरात असलेल्या इमारतीचे संरचनात्मक परिक्षण ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ नोंदणीकृत संरचना अभियंता, अधिकृत संस्थेकडून करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

१५ दिवसांचा अल्टिमेटम, तर कारवाई

तज्ञांनी सुचविलेल्या दुरूस्त्या पुर्ण करून ती इमारत वापरण्यास योग्य असल्याचे बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र १५ दिवसाचे आत इमारत मालक, भोगवटदारांनी महापालिकेच्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र सादर करण्यामध्ये इमारत मालक, भोगवटदारांनी कसूर केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा अल्टिमेटम आयुक्तांनी दिला आहे. तो दंड २५ हजारांच्या घरात असेल.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाAmravatiअमरावतीAccidentअपघात