एलबीटीचे असेसमेंट सुरूच

By Admin | Updated: September 21, 2015 00:12 IST2015-09-21T00:12:07+5:302015-09-21T00:12:07+5:30

राज्य शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) महापालिकेतून हद्दपार केला असला तरी व्यावसायिक, प्रतिष्ठानचे कर मूल्यांकन केले जात आहे.

Establishment of LBT Assessment | एलबीटीचे असेसमेंट सुरूच

एलबीटीचे असेसमेंट सुरूच

नोटीस : व्यावसायिकांना कर भरण्याची ताकिद
अमरावती : राज्य शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) महापालिकेतून हद्दपार केला असला तरी व्यावसायिक, प्रतिष्ठानचे कर मूल्यांकन केले जात आहे. त्याकरिता महापालिका प्रशासनाने १७०० व्यावसायिकांना नोटीस बजावल्या असून कर भरण्याची ताकिद देण्यात आली आहे.
१ आॅगस्टपासून एलबीटीमुक्त राज्य केले आहे. परंतु यापूर्वी व्यवसायिकांनी एलबीटी भरलाच, अशा व्यावसायिकांकडून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात १० हजारांच्या वर एलबीटी नोंदणीकृत व्यावसायिक होते. त्यापैकी काही वस्तूंच्या दरात तफावत असल्याची बाब पुढे करुन ती जकात कराप्रमाणे वसूल करावी, अशी मागणी चेंबर्स आॅफ कॉमर्सची होती. २१ महिन्यांच्या साहित्य, वस्तू किंमत फरकाचा वाद अद्याप शासन स्तरावर प्रलंबित आहे. अभय योजनेतंर्गत अर्ज सादर करणाऱ्या १७०० व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कर मूल्यांकन ही निरंतर प्रकिया असून व्यावसायिकांनी कराचा भरणा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन एलबीटी विभागप्रमुख सुनील पकडे यांनी दिली. दुसरीकडे महापालिकेचा कारभार व्यवस्थितरीत्या सुरू राहावा, यासाठी शासन दरमहा ७ कोटी १४ लाख रुपयांचे अनुदान पाठवीत आहेत. एलबीटी नोंदणीकृत सर्वच व्यावसायिकांना नोटीस बजावून कर मूल्यांकन करण्याचा सूचना दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Establishment of LBT Assessment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.