विभागात ११२ शेतकरी गटांची स्थापना

By Admin | Updated: November 1, 2014 01:29 IST2014-11-01T01:29:45+5:302014-11-01T01:29:45+5:30

कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी चालू आर्थिक वर्गात वर्ष २०१४-१५ राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत विभागात ...

Establishment of 112 farmer groups in the department | विभागात ११२ शेतकरी गटांची स्थापना

विभागात ११२ शेतकरी गटांची स्थापना

कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी चालू आर्थिक वर्गात वर्ष २०१४-१५ राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत विभागात ११२ शेतकरी गट स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी केंद्राकडून सुमारे ४ लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी काही रक्कम विभागाला प्राप्त झाले असून त्याचे जिल्हा स्तरावर वितरण करण्यात आले.
बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांना एकत्रित करुन त्यांना खते, बी-बियाणे कीटकनाशके, कीडरोग, उत्पादन वाढविणे, काढणीपर्यंत मेहनत, प्राथमिक प्रक्रिया, बाजारपेठ, अभ्यासदौरे, प्रत्यक्ष भेटी, शास्त्रज्ञ मार्गदर्शन यांची सर्व माहिती करुन देण्यात येणार आहे. तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादित मालाची सक्षमपणे विक्री करुन अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एका गटामध्ये वीस शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असून यामुळे हजारो शेतकरी एकत्रित येणार आहेत. त्याकरिता शेतकरी असणे ही एकमेव अट आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गटांनी आत्मा अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतीच्या गटांतर्गत समन्वय साधन्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर समीत्या स्थापन करण्यात येणार आहेत.
शेतकरी गटाच्या स्थापन आणि वार्षिक देखभालीसाठी दोन हजार तर कुशल तंत्रज्ञान प्रशिक्षण मार्गदर्शनासाठी तीन हजार रुपये देण्यात येणार आहे.

Web Title: Establishment of 112 farmer groups in the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.