शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सहाय्यक वनसंरक्षकांच्या पदोन्नती यादीत त्रुटी; वादग्रस्त, चौकशीतील नावांचाही समावेश

By गणेश वासनिक | Updated: May 27, 2023 19:05 IST

Amravati News वन विभागाने जाहीर केलेल्या पदोन्नतीच्या यादीत अनेक त्रुटी असल्याने या यादीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

गणेश वासनिक अमरावती: राज्याच्या वन विभागाने १०७ सहाय्यक वनसंरक्षकातून ८५ जणांना विभागीय वनाधिकारीपदी पदोन्नतीची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत बऱ्याच त्रुटी असून, काही वादग्रस्त आणि विभागीय चौकशी सुरू असलेल्या एसीएफ यांचीही नावे असल्यामुळे या यादीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

नागपूर येथील वन बल भवनातून प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमीता बिश्वास यांनी ३१ मार्च २०२३ रोजी सहाय्यक वनसंरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गामध्ये पदोन्नतीसाठी प्रस्ताव तयार केले आहे. यात भाषा परीक्षा, संगणक परीक्षा, मत्ता व दायित्व यासह विभागीय चौकशी वा फौजदारी प्रकरण असल्यास ते बढती पूर्वी वरिष्ठांकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच मागील १० वर्षाचा सेवा तपशील विवरण पत्रात एसीएफ यांना सादर करण्याचे कळविले होते. मात्र, वन विभागाने एसीएफ यांची पदोन्नती यादी जाहीर केली असता यात काही वादग्रस्त, विभागीय चौकशीतील एसीएफच्या नावांचाही समावेश आहे. त्यामुळे वन विभागाने जाहीर केलेली एसीएफ यांची यादी त्रुटीयुक्त असल्याचे वास्तव आहे. वसव यांचे सुसाईड नोट व्हायरल प्रकरण गुंडाळले?मेळघाट प्रादेशिक वनविभागातंर्गत घटांग येथील सहायक वनसंरक्षक व्ही.पी. वसव यांनी १० एप्रिल २०२२ रोजी स्वत:च सुसाईट नोट व्हायरल करून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना गोवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी नागपूर येथील वरिष्ठांनी वसव यांना लेखी समज देऊन खुलासा मागविला होता. याबाबत मुख्य वनसंरक्षक़ जी.के. अनारसे यांच्या अध्यक्षतेत चाैकशी समितीदेखील गठीत करण्यात आली होती. मात्र, असे असताना आता व्ही. पी. वसव यांचे पदोन्नती यादीत ३८ व्या क्रमांकावर  नाव आहे. त्यामुळे सुसाईड नोट व्हायरल प्रकरण गुंडाळले तर नाही? अशी चर्चा रंगू लागली आहे.सहाय्यक वनसंरक्षक व्ही.पी. वसव यांनी सुसाईड नोट व्हायरल केल्यासंदर्भातील चौकशी अहवाल वरिष्ठांना दिला आहे. याबाबत वरिष्ठांनी एसीएफ वसव यांना समज दिल्याची माहिती आहे. पुढे नेमकी त्यांच्यावर कोणती कारवाई झाली, हे वरिष्ठांनाच माहिती आहे. पदोन्नती यादीत नावांबाबत सीएफ कार्यालयाचा संबंध नाही.- जी.के. अनारसे, सीएफ, प्रादेशिक अमरावती.

टॅग्स :forest departmentवनविभाग