१२ पीएसआयची एपीआयपदी पदोन्नती

By Admin | Updated: January 9, 2017 00:04 IST2017-01-09T00:04:43+5:302017-01-09T00:04:43+5:30

राज्यातील ४८३ नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांना पद्दोन्नती देऊन त्यांच्या तात्पुरत्या स्वरुपात एपीआयपदावर बदल्या करण्यात आल्या आहेत.

Episode promotion of 12 PSI | १२ पीएसआयची एपीआयपदी पदोन्नती

१२ पीएसआयची एपीआयपदी पदोन्नती

बदली प्रक्रिया : थोरात, पारधी मुंबईत
अमरावती : राज्यातील ४८३ नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांना पद्दोन्नती देऊन त्यांच्या तात्पुरत्या स्वरुपात एपीआयपदावर बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील डझनभर पीएसआयचा समावेश आहे.
अमरावती ग्रामीणचे पाच तर शहरातील सात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस निरीक्षकपदावर या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश शनिवारी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आले.


चौघे परिक्षेत्रात
अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण व शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पीएसआयच्या विविध शहरांत बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पीएसआय किशोर तुळशीराम इंगळे, अरूण ज्ञानेश्वर डोईफोडे, दिलीप आनंद पोटे, दिलीप शंकर पेटे यांना अमरावती परिक्षेत्रात, तर प्रियंका विवेक कोटावार यांना अमरावतीतील गुन्हे अन्वेषण विभागात पद्दोन्नती देण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पीएसआय बळीराम रामदास बंदखडके यांना नांदेड परीक्षेत्र, नीलेश पाटील यांना मुंबई शहर, सुनीता विश्वनाथ काळे यांना अमरावती शहर, विलास पंडित पवार यांना मुंबई शहर, नितीन भूंजगराव थोरात यांन नवी मुंबई, करीमखान सलारखान पठाण यांना नांदेड परिक्षेत्र, श्रीकृष्ण बापू पारधी यांना मुंबई शहरात पद्दोन्नती मिळाली आहे.

Web Title: Episode promotion of 12 PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.