लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हिंदूस्थान पेट्रोलियमतर्फे आयोजित ‘सक्षम सायकल डे’ स्पर्धेत रविवारी लहानांपासून वृद्धांपर्यंत अशा १५०० जणांनी सहभाग घेतला. यामध्ये मुली व महिलांचीही उपस्थिती होती. यावेळी दोन मंत्र्यांसह खासदारांनासुद्धा सायकल चालविण्याचा मोह आवरता आला नाही. ‘सायकल चालवून इंधनाची बचत करा व पर्यावरणाचा ºहास थांबवा’, असा संदेश यातून देण्यात आला. ही सायकल रॅली येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरातून काढण्यात आली.पर्यावरण संरक्षण अनुसंधान संघ, हिंदूस्थान पेट्रोलियम, कार्पोरेशन लि. गॅस मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल रॅलीचे विभागीय क्रीडा संकुलातून रविवारी सकाळी ९ वाजता विभागीय आयुक्त पीयूष सिंह व प्रभारी जिल्हाधिकारी संजय पवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. गर्ल्स हायस्कूल चौक, पोलीस पेट्रोलपंपमार्गे रेल्वे स्टेशन चौक व इर्विन चौकातून रॅली कार्यक्रमस्थळी पोहचली. रॅलीत सहभागी झालेल्यांचा लॅकी ड्रॉ काढण्यात आला. यावेळी ११ विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सायकलचे वितरण झाले. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदूस्थान पेट्रोलियम नागपूरचे मुख्य क्षेत्रिय प्रबंधक मुकुंद जवंजाळ हे होते. विशेष अतिथी म्हणून महिला व बालकल्याण तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा व लाभक्षेत्र शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके आदी उपस्थित होते. आयोजकांच्यावतीने रॅलीत सहभागी नागरिकांना टी-शर्टचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक मुकुंद जवंजाळ, संचालन दिव्या पछीगर व आभार विशाल सूर्यवंशी यांनी मानले.लोकप्रतिनिधींची लक्षणीय उपस्थितीअमरावतीच्या पालकमंत्री, राज्यमंत्री व खासदार यांनी रॅली स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शविली. यावेळी राज्याचे दोन मंत्री व खासदारांनी स्पर्धकांचे कौतुक करून पर्यावरण संवर्धन आणि उत्तम आरोग्याकरिता व इंधन बचतीकरिता सायकल एक उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू व खासदार नवनीत राणा यांनाही सायकल चालविण्याचा मोह आवरता आला नाही. सर्वांनी विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानात सायकल चालवून पर्यावरणाचा संदेश दिला.
सायकल चालवून मंत्री खासदारांचा पर्यावरण संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST
पर्यावरण संरक्षण अनुसंधान संघ, हिंदूस्थान पेट्रोलियम, कार्पोरेशन लि. गॅस मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल रॅलीचे विभागीय क्रीडा संकुलातून रविवारी सकाळी ९ वाजता विभागीय आयुक्त पीयूष सिंह व प्रभारी जिल्हाधिकारी संजय पवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. गर्ल्स हायस्कूल चौक, पोलीस पेट्रोलपंपमार्गे रेल्वे स्टेशन चौक व इर्विन चौकातून रॅली कार्यक्रमस्थळी पोहचली.
सायकल चालवून मंत्री खासदारांचा पर्यावरण संदेश
ठळक मुद्देसायकल रॅली : १५०० जणांचा उत्स्फूर्त सहभाग