शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

शहरांचे पर्यावरण ठेवणार सुरक्षित, संवेदनशील क्षेत्रांचे होणार सॅटेलाईट मॅपिंग, भौगोलिक माहिती प्रणाली लागू

By गणेश वासनिक | Updated: December 27, 2022 18:00 IST

Maharashtra News: महानगरपालिका, प्राधिकरणे, नगरपरिषदांमध्ये विकास जलदगतीने व नियोजन पूर्ण करण्याकरिता शासनाने आराखडा हाती घेतला असून भौगोलिक माहिती प्रणालीने (जीआयएस) हा आराखडा तयार केला जाणार आहे

- गणेश वासनिक अमरावती : महानगरपालिका, प्राधिकरणे, नगरपरिषदांमध्ये विकास जलदगतीने व नियोजन पूर्ण करण्याकरिता शासनाने आराखडा हाती घेतला असून भौगोलिक माहिती प्रणालीने (जीआयएस) हा आराखडा तयार केला जाणार आहे. यात पर्यावरण, वनक्षेत्र, वन्यजीवांची काळजी घेण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीद्वारे शहरातील पर्यावरण क्षेत्र अबाधित ठेवले जाणार आहे.

राज्याच्या नगर विकास विभागाने २९ नोव्हेंबर २०२२ राेजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५४ अन्वये महापालिका, विशेष नियोजन प्राधिकरणे, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या क्षेत्रासाठीचा विकास योजना या जीआयएस प्रणाली वापरून द्रुतगती पद्धतीने तयार केला जाणार आहे. महानगरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरे अपुरे पडत असल्याने शासकीय जमिनीवर अतिक्रमणे वाढली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास आराखडा थातुर मातुर असल्याने शहरांचा श्वास गुदमरत आहे. शहर सुंदर आणि सुटसुटीत असावे, याकरिता जिल्हाधिकारी व भूमी अभिलेखमार्फत हे जीआयएस सर्वेक्षण करण्यात येणार आहे.बेस मॅप तयार करणारमहानगरपालिका, नगर परिषद अशा ठिकाणचे भूमी अभिलेख विभाग गाव, नकाशे हे जीआयएसने रेफरन्स उपलब्ध करुन घेतील. दोन्ही नकाशे सुसंगत करण्यात येईल. यासाठी जमाबंद आयुक्त, पुणे खात्री करतील. शिवाय हा रिझोल्युशन ड्रोनद्वारे रेफरसिंग, जीआयएस पद्धतीने कॅडस्टूल नकाशा अद्ययावत करुन बेसमॅप तयार करण्यात येणार आहे.असे होणार ३३ प्रकारचे सर्वेक्षण बेस मॅप, सॅटेलाईट ईमेज, झोनल मास्टर प्लॅन, सब- झोन मास्टर प्लॅन, टुरिझम मास्टर प्लॅन, अधिसूचित वन विभाग, वन सदृश्य क्षेत्र, वृक्ष आणि वनसंपत्ती, जलस्त्रोत्र, गावठाण व मानवी वस्त्या, २० अंश पेक्षा जास्त उतार क्षेत्र, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र, वन्यजीव, वारसा जतन स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, घन कचरा व्यवस्थापन, कचरा साठवण स्थळ, मैलाशुद्धीकरण प्रकल्प, टाकाऊ पदार्थ गोळा करण्याचे स्थळ, पर्जन्यमान, हवामान खाते, व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्र, बफर झोन, रस्त्याचे जाळे, रिंग रोड, वर्गिकृत रस्ते, अग्निप्रवण क्षेत्र, एनजीओ व तज्ञ्जांची बैठक, खनीकर्म स्थळ, पवनचक्की, भूजल सारणी, पायाभूत सुविधा प्रकल्प, उच्चदाब विद्युत वाहिनीचे जाळे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, भूकंप पूर, जमीन खचणे, मोबाईल टॉवर्स, गावनिहाय ईंधन वापरचा सर्वेक्षणात समावेश असणार आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकार