शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
3
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
4
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
5
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
6
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
7
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
9
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
10
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
11
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
12
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
13
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
14
Test Twenty New Cricket Format : टेस्टमध्ये टी-२० ट्विस्ट! क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटसंदर्भातील रंजक गोष्ट
15
१३ वर्षांच्या मुलीचं बळजबरीने लावलं लग्न, बलात्कार, पतीसह ५ जणांवर गुन्हा, पालघरमधील धक्कादायक घटना 
16
VIRAL VIDEO : दिवाळीच्या फुलबाज्या कशा बनवल्या जातात? फॅक्टरीतला व्हिडीओ होतोय व्हायरल! बघाच...
17
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
18
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
19
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
20
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली

पूर्णा प्रकल्पाची नऊ दारे उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

मध्यप्रदेशमधील भैसदेही व बापजाई भागात दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच तालुक्यात गेल्या ३६ तासापासून सतत पाऊस सुरू असल्याने विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला होता. धरणात आज पर्यंत ८४.८९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे पूर्णा प्रकल्पाचे संपूर्ण नऊ दरवाजे २० सेंटीमीटर उघडण्यात आले आहे. यामधून १५४ घनमिटर प्रतिसेकंद क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविहंगम दृश्य। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, पर्यटकांच्या उत्साहाला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा प्रकल्पालगतच्या भागात ३६ तासापासून पावसाने जोर वाढला असल्याने धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे धरणाचे सर्व नऊ दरवाजे २० सेंटिमिटरने उघडण्यात आली आहेत. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मध्यप्रदेशमधील भैसदेही व बापजाई भागात दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच तालुक्यात गेल्या ३६ तासापासून सतत पाऊस सुरू असल्याने विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला होता. धरणात आज पर्यंत ८४.८९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे पूर्णा प्रकल्पाचे संपूर्ण नऊ दरवाजे २० सेंटीमीटर उघडण्यात आले आहे. यामधून १५४ घनमिटर प्रतिसेकंद क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने सरासरी पेक्षाही जास्त जलसाठा धरणात शिल्लक आहे. विश्रोळी धरणक्षेत्रातील महसूल मंडळात गेल्या २४ तासात सावलमेंढा ८३ मिमी, भैसदेही १६० मिमी तर विश्रोळी येथे ७५ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. तसेच धरणात जिवंत साठा ३०. ०२५५ दलघमी अर्थात ८४.८९ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी ४५०.८१ मीटरपर्यंत वाढली आहे. तालुक्यात पुढील २४ तासात सुद्धा पाऊस जोर धरत असल्याने तसेच धरणात पाण्याचा मोठा जलसाठा झाल्याने धराणातून विसर्ग केला जात आहे. धरणातून सोडलेले पाणी नदीपात्रातच राहणार असून नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता अक्षय इरसकर यांनी दिली.यामुळे कोरोना काळातही पर्यटकांची पावले पुर्णा सिंचन प्रकल्पाकडे वळली आहे. यंदा आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हयातही दमदार पाऊस झाल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत.

टॅग्स :Purna Riverपूर्णा नदीDamधरण