प्रसूतितज्ज्ञावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: September 27, 2015 00:07 IST2015-09-27T00:07:06+5:302015-09-27T00:07:06+5:30
मुधोळकर पेठ स्थित अंबा मॅटर्निटी हॉस्पिटलमधील प्रसूतितज्ज्ञ शोभा पोटोडे यांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप पीडित चव्हाण दाम्पत्यांनी केला आहे.

प्रसूतितज्ज्ञावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
पत्रपरिषद : हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा दाम्पत्याचा आरोप
अमरावती : मुधोळकर पेठ स्थित अंबा मॅटर्निटी हॉस्पिटलमधील प्रसूतितज्ज्ञ शोभा पोटोडे यांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप पीडित चव्हाण दाम्पत्यांनी केला आहे. डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावी, अशी मागणी शनिवारी चव्हाण दाम्पत्याने पत्रपरिषेदतून दिली आहे.
पीडितेचे पती किशोर चव्हाण यांच्या माहितीनुसार त्यांची पत्नी तनुजा चव्हाण यांच्या प्रसुतीचा उपचार मुधोळकर पेठ स्थित अंबा मॅटनिटी हॉस्पिटमध्ये नियमित सुरु होता. त्यांना १० वर्षानंतर मूल होत असल्यामुळे चव्हाण कुटुंबीय तनुजा चव्हाण यांची विशेष काळजी घेत होते. मात्र, १ सप्टेंबर रोजीच्या सकाळी १०.४५ वाजता तनुजा चव्हाण यांच्या गर्भाशयातील पाणी जात असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तनुजा यांना तत्काळ अंबा मॅटनिटी हॉस्पिटलला नेले. तेथे प्रसूतितज्ज्ञ शोभा पोटोडे यांनी तनुजाची तपासणी करून सर्व काही चांगले असल्याचे सांगितले. दिवसभर प्रसूतीची प्रतीक्षा करणाऱ्या तनुजाची अखेर रात्री ९.३० वाजता फोरसेफ प्रसूती करण्यात आली. तनुजाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, बाळाच्या कानामागे गंभीर जखमा झाल्यामुळे त्याला श्वासोच्छश्वासाचा त्रास सुरु झाला. बालरोग तज्ज्ञ पंकज बारब्दे यांना बोलावून बाळांची तपासणी केली.
चौकशीसाठी तीन डॉक्टरांची समिती
चव्हाण यांचे बाळ नेमके कोणत्या कारणाने दगावले, याबाबत चौकशी करण्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत यांनी तीन तज्ज्ञ डॉक्टरांची समिती या प्रकरणाच्या चौकशीकरिता नेमली आहे. त्यामध्ये अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अशोक वणकर, बालरोग तज्ज्ञ हृषीकेश नागलकर व वैद्यकीय अधिकारी काळपांडे यांचा सहभाग आहे. चौकशी समिती नेमल्याचे पत्र चव्हाण यांना १९ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले असून चौकशी अहवाल सात दिवसांच्या मिळणार असल्याची माहिती किशोर चव्हाण यांनी दिली.
चव्हाण यांना मधुमेहाचा आजार आहे. त्यातच त्यांचे बाळ अपुऱ्या दिवसांचे होते. त्यांच्या गर्भाशयातील पाणी गळत होते. बाळाची वाढ चांगली झाली होती. त्यामुळे नॉर्मल प्रसूती करण्यात आली.
- शोभा पोटोडे,
प्रसूती तज्ज्ञ.