शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना करता येणार 'जलसंपदा' विभागात इंटर्नशीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:49 IST

ना विद्यावेतन, ना मानधन : अवर सचिवांचे आदेश

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठ व महाविद्यालयांत अभियांत्रिकीसाठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता जलसंपदा विभागात इंटर्नशिप करता येणार आहे. राज्याच्या अवर सचिव राखी चव्हाण यांनी याबाबत १५ जानेवारी रोजी आदेश काढले आहेत. मात्र, इंटर्नशिप करणाऱ्या कुठल्याही प्रशिक्षणार्थीला विद्यावेतन किंवा मानधन दिले जाणार नाही.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जलसंपदा बांधकाम प्रकल्प, उपसा सिंचन योजना, जलनियोजन, जल हवामान, पर्जन्य, सिंचन व्यवस्थापन, प्रकल्प आरेखनाबाबत माहिती व्हावी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे.

या अनुभवाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील व्यावसायिक वाटचालीसाठी उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखाली नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना व जलविज्ञान व धरण सुरक्षितता संघटना या तीन संस्थांसह राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये 'आंतरवासिता' उपक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० अन्वये शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आंतरवासिता 'इंटर्नशिप' उपक्रम हा महत्त्वाचा भाग असून, अभियांत्रिकी विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता लागू करण्यात आली आहे. यानुसार जलसंपदा विभागात प्रत्यक्ष चालणाऱ्या कामकाजाबाबतची माहिती अभियांत्रिकीविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होईल.

कोण राहील पात्र?राज्यातील मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाच्या (बीई किंवा बीटेक) तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात शिकत असलेला विद्यार्थी आंतरवासिता उपक्रमासाठी पात्र राहील. सोबतच, एमई किंवा एमटेकच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत असलेला विद्यार्थी आंतरवासिता उपक्रमासाठी पात्र असणार आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या आंतरवासितेची संरचना विद्यापीठाशी चर्चा करून करण्यात येईल.

ऑनलाइन नोंदणीऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक राहील. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, आवश्यक कौशल्य यांचा विचार करून मुलाखतीद्वारे निवडीसंदर्भात कार्यवाही संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर करण्यात येईल.

टॅग्स :Educationशिक्षणAmravatiअमरावती