शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टेरेसवरील वॉटर टॅंकमध्ये आढळला अभियंता तरुणीचा मृतदेह; आत्महत्या की खून? चर्चेला उधाण

By प्रदीप भाकरे | Updated: December 3, 2022 16:44 IST

पोलिसांचा मोठा ताफा रत्नदीप कॉलनी परिसरात दाखल; शवविच्छेदन अहवालानंतर होईल उलगडा 

अमरावती : २८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून घरून बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय अभियंता तरुणीचा मृतदेह ३ डिसेंबर रोजी सकाळी घराच्या टेरेसवर असलेल्या वॉटर टँकमध्ये आढळला आहे. ही धक्कादायक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रत्नप्रभा कॉलनीमध्ये उघड झाली.

अश्विनी गुणवंतराव खांडेकर (२८) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अश्विनी २८ नोव्हेंबरपासून घरून बेपत्ता होती. घरातून निघण्यापूर्वी मैत्रिणीकडे जाते, असं तिने सांगितले होते. मात्र मैत्रिणीकडे कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती मैत्रिणीकडे नसल्याचे समोर आले होते. दरम्यान त्याच दिवशी अश्विनीचा भाऊ आशिष यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून अश्विनी बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदवली होती. त्यामुळे  चार दिवसापासून कुटुंबीय आणि पोलीस अश्विनीचा शोध घेत होते.

दरम्यान शनिवारी सकाळी कुटुंबीयांना पाण्यातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले, त्यामुळे कुटुंबीयांनी टेरेसवर असलेल्या वॉटर टॅंकमध्ये जाऊन पाहिले, त्यावेळी त्यांना अश्विनीचा पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह दिसून आला. पोलिसांनी तात्काळ ही माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळतात डीसीपी सागर पाटील, एसीपी पुनम पाटील, ठाणेदार आसाराम चोरमले तसेच अन्य पोलीसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेह टँकमधून बाहेर काढण्यात आला. दरम्यान अश्विनीची हत्या की तिने आत्महत्या केली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

एक हजार लिटरची वॉटर टँक

अश्विनीचा मृतदेह असलेली वॉटर टॅंक ही १ हजार लिटर क्षमतेची आहे. त्याची उंची पाच फूट असून पोलिसांनी पाहिले असता त्याचे झाकण उघडलेले होते. त्यामुळे अश्विनीने त्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली किंवा कसे, याबाबत तूर्तास काहीही समोर आलेले नाही. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. 

प्रभारी आयुक्तांनी गाठले घटनास्थळ 

अभियंता अश्विनी ही आई आणि भावासह रत्नदीप कॉलनी येथील घरात रहात होती. शनिवारी सकाळी अश्विनीचे मामा नळाच्या पाण्याने तोंड धुत असताना त्यांना पाण्यातून दुर्गंधी आली. त्यांनी घरावरची पाण्याची टाकी तपासली असता त्यामध्ये अश्विनीचा मृतदेह आढळून आला. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. प्रभारी पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, ठाणेदार आसाराम चोरमले यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा रत्नदीप कॉलनी परिसरात पोहोचला. श्वान पथक देखील घटनास्थळी पोहोचले.

तरुणीचा मृतदेह वॉटर टँकमध्ये आढळला. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी  पाठवला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांकडून प्राथमिक अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

- आसाराम चोरमले, ठाणेदार गाडगे नगर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAmravatiअमरावती