-अखेर गोपालनगरातील अतिक्रमित दारू दुकान पाडले
By Admin | Updated: August 4, 2016 00:05 IST2016-08-04T00:05:34+5:302016-08-04T00:05:34+5:30
दिड वर्ष सातत्याने विरोध झाल्यानंतर गोपाल नगरातील अतिक्रमित दारूचे दुकान अखेर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी पाडले.

-अखेर गोपालनगरातील अतिक्रमित दारू दुकान पाडले
मनसेच्या पाठपुराव्याला यश : अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई
अमरावती : दिड वर्ष सातत्याने विरोध झाल्यानंतर गोपाल नगरातील अतिक्रमित दारूचे दुकान अखेर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी पाडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दारू दुकानविरोधात आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने हे यश मिळाले आहे.
एमआयडीसी रोडवरील दारूचे दुकान हटविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या दिड वर्षांपासून करीत आहेत. या भागातील व्यापारी संघटनांनी सुध्दा दारू दुकानाला विरोध केला आहे. यासंदर्भात मंगळवारी महापालिका आयुक्तांना निवेदन देवून दारूचे दुकान हटविण्याची मागणी करण्यात आली होती. हे दारुचे दुकान जमिनदोस्त करण्यात यावे, यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष प्रवीण डांगे, उपशहर प्रमुख संजय गव्हाळे, प्रदीप कन्हेकर, सागर गादे, जनार्धन बंड, गणेश तायवाडे, शाम निकम, सागर मोहोकार, मंगेश इंगळे, मनीष पांडे आदींनी पाठपुरावा केला आहे. महापालिका आयुक्तांना मंगळवारी सदर पदाधिकाऱ्यांनी पुन्हा स्मरण देऊन दारूचे दुकान हटविण्यासंदर्भात निवेदन सादर केले. त्यावेळी आयुक्तांनी दुकानाचे अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार बुधवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या नेत्तृत्वात पोलिसांच्या सुरक्षिततेत दारू दुकानाचा अतिक्रमित भाग पाडण्यात आला. अतिक्रमण हटविताना नागरिकानी मोठी गर्दी केली होती.