बांधकाम विभागाच्या फलकावर पोलिसांचे अतिक्रमण
By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:29:34+5:302016-03-16T08:29:34+5:30
सामान्य नागरिकांना शहराच्या विविध भागाची माहिती व्हावी, कुठला मार्ग किती किमीचा आहे, तो कोठून कुठे जोडला जातो, ..

बांधकाम विभागाच्या फलकावर पोलिसांचे अतिक्रमण
पोलिसांचा अतिरेक : लावला नवीन शोध
अमरावती : सामान्य नागरिकांना शहराच्या विविध भागाची माहिती व्हावी, कुठला मार्ग किती किमीचा आहे, तो कोठून कुठे जोडला जातो, यासाइी सार्वजनिक बांधकाम विभागाने शहराच्या विविध मार्गावर माहितीफलक लावलेले आहेत. परंतु सामान्य जनतेला नियम, कायदा, सुव्यवस्था शिकविणाऱ्या वाहतूक प्रशासनाने चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहिती फलकावर अतिक्रमण केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या माहिती फलकावर वाहतूक पोलीस प्रशासनाने त्यांचे फलक लावलेले आहेत. त्यामुळे त्या फलकावर काय माहिती होती, हे आता दिसेनासे झाले आहे.
शहरातील विविध रस्त्यावर हा प्रकार पहावयास मिळत आहे. सामान्य जनता रस्त्यावरून प्रवास करीत असताना योग्य माहिती मिळत नसल्याने गोंधळात पडल्याचे ऐकिवात आहे. हे कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन नव्हे का? (प्रतिनिधी)
असे फलक लावणे चुकीचे आहे, निदर्शनास आल्यास वाहतूक पोलिसांकडून काढण्यात येतील व योग्य कार्यवाही करण्याचे संबंधितांना आदेश देण्यात येतील.
- दत्तात्रेय मंडलिक,
पोलीस आयुक्त