अनेक दिवसांपासून अंजनसिंगीत परप्रांतीयांचा लोंढा कामासाठी तसेच रस्त्यावर टपरी टाकून व्यवसाय करण्यासाठी येत आहे. तिथे येऊन राहण्यासाठी भाड्याचे घर घेण्याऐवजी शासनाची रिकामी जागा ताब्यात घेऊन तिथे हे राहत आहेत. या अतिक्रमणधारकांना स्थानिक ग्रामपंचायतीकडून सुविधा पुरविल्या जात आहेत. कुठलीही कारवाईची नोटीस किंवा दंड ग्रामपंचायत आकारत नाही किंवा महसूल विभागसुद्धा आकारत नाही. त्यामुळे जागेवर अतिक्रमण करून ती विकणे आणि त्या ठिकाणी पुन्हा नवीन अतिक्रमण करणे हा व्यवसायच झाला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांची ग्रामपंचायत किंवा पोलीस प्रशासनाकडे कुठलीही नोंद नाही. त्यामुळे गावाला आणि परिसराला मोठा धोका निर्माण झालेला आहे. ग्रामपंचायत आणि महसूल विभागाने थेट कारवाई करून अतिक्रमण केलेली परप्रांतीयांनी जागा खाली करून घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत
अंजन्सिंगी येथील ई-क्लास जागेवर परप्रांतीयांची अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:12 IST