अतिक्रमण हटविले; दोन वराह पालकांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 00:16 IST2016-02-10T00:16:42+5:302016-02-10T00:16:58+5:30

नागरिकांच्या तक्रारीनुसार शहरातील यशोदानगर, फरशी स्टॉप, पंचवटी ते बचत भवन मार्गावर अनधिकृत मांस विक्री, ...

Encroachment deleted; Foreclosure for two Peers Parents | अतिक्रमण हटविले; दोन वराह पालकांवर फौजदारी

अतिक्रमण हटविले; दोन वराह पालकांवर फौजदारी

मांस विक्रेत्यांवर कारवाई : मोकाट वराह पकडले
अमरावती : नागरिकांच्या तक्रारीनुसार शहरातील यशोदानगर, फरशी स्टॉप, पंचवटी ते बचत भवन मार्गावर अनधिकृत मांस विक्री, मोकाट वराह व अतिक्रमण हटविण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली. या कारवाई दरम्यान मोकाट वराह पकडताना मनाई करणाऱ्या दोन वराह पालकांविरुद्ध राजापेठ पोलिसात फौजदारी दाखल करण्यात आली आहे.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार पशुशल्य चिकित्सक विभाग व अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई केली आहे. गत काही दिवसांपूर्वी स्थानिक यशोदानगर परिसरातील ४० महिलांनी अनधिकृत मांस आणि दारु विक्र ी होत असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात अनधिकृ त बांधकाम हटविण्यात आले. जनावरे जप्त करण्यात आलीत. एकूण चार ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच स्थानिक फरशी स्टॉप परिसरात सामुहिक पारायण सोहळ्याचे आयोजन आले असून या भागात मोकाट वराहांचा हैदोस असल्यामुळे वराह पकडण्याची कारवाई सुरु असताना वरहा पालक मोहन निंदाने, कैलास निंदाने यांनी अडथळा निर्माण केला. अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या अशी तक्रारी राजापेठ पोलिसात देण्यात आली आहे.
मांस विक्रेत्यांना नियमानुसार परवाने
अमरावती : यातक्रारीच्या अनुषंगाने निंदाने यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात आली आहे. येथील गौरक्षण संस्थेच्या जागेवर मांस विक्री करणारे दुकाने हटविण्यात आली. पंचवटी ते बचत भवन मार्गावर उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
मोकाट वराह पालकांनी पशुवैद्यक अधिकारी सचिन बोंद्रे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार राजापेठ पोलिसात दिली आहे. मांस विक्रेत्यांचे साहित्य, कोंबड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मोकाट वराह व उघड्यावरील मांस विक्रेत्याविरुद्ध कारवाई करताना महापालिका कर्मचाऱ्यांसोबत वाददेखील झाला. परंतु कर्मचाऱ्यांनी ही कारवाई सुरु ठेवल्याचे दिसून आले. कारवाईत डॉ. सचिन बोंद्रे, पोलीस निरिक्षक रामभाऊ खराटे, आरोग्य निरिक्षक सागर गवई, अब्दुल रफिक आदी कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.
शहरात मांस विक्रीचे परवाने हे नियमानुसार दिले जातील, असा निर्णय आयुक्त गुडेवार यांनी घेतला आहे. मांस विक्रीचे परवाने देताना नियम डावलून काहीही होणार नाही, ही बाब प्रशासनाने स्पष्ट केली आहे. अटी, शर्तीच्या अधीन राहून मांस विक्रेत्यांना परवाने देऊ असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Encroachment deleted; Foreclosure for two Peers Parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.