रोजगार हमी योजनेत आता राबू लागले ‘प्रेतात्मे’
By Admin | Updated: July 22, 2014 23:47 IST2014-07-22T23:47:02+5:302014-07-22T23:47:02+5:30
बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली. मात्र या योजनेत काम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आकृष्ठ करण्यात प्रशासकीय यंत्रणा

रोजगार हमी योजनेत आता राबू लागले ‘प्रेतात्मे’
वास्तव : मृतांच्या नावावर काढले जातात मनरेगाचे पैसे
सुरेश सवळे - चांदूरबाजार
बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली. मात्र या योजनेत काम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आकृष्ठ करण्यात प्रशासकीय यंत्रणा उदासिन असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत कामासाठी मजुरांचे लक्ष्य दिले जाते. त्या मोबदल्यात या कामाच्या मोबदल्याचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो. अशातल्या प्रकारातच चांदूरबाजार तालुक्यातील पिंप्री (थुगाव) येथे ‘मनरेगा’च्या कामावर दाखविलेले मजूर चक्क ‘मृत’ असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसते. याबाबत पिंप्री (थुगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ काशीकर यांनी या मृतकांच्या माहितीसह या अपहाराची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.
पिंप्री ग्रामपंचायतीतर्फे रस्ता मजी खोदकाम २७ मे २०११ पासून करण्यात आले. मात्र या कामावर राबलेल्या मजुरांच्या देयकावर ज्यांची नावे आहेत त्यातील अनेक मजूर या जगातच नाहीत. त्यामुळे त्याच्या मजुरीचे पैसे कुणी उचलले?आरोपही हरिभाऊ काशीकर यांनी केला आहे. खोदकाम केलेला रस्ता नेमका गावातील आहे की गावाबाहेर याचाही उलगडा होत नाही. अनेक सुखवस्तू घरातील नागरिक वृद्ध, लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली तर काही अनोळखी व्यक्तींची नावेही या यादीत आहेत. या सर्वांची नावे टाकून शासनाने हजारो रूपये हडपल्याचा आरोप काशीकर यांनीतक्रारीत केला आहे. तालुक्यात ४ हजार २३७ मजुरांनी कामासाठी मागणी केली असली तरी प्रत्यक्षात मात्र इतके मजूर कामावर नसल्याचे वास्तव आहे. पिंप्री येथे तब्बल सात मृतकांनी १५० दिवस काम केल्याचे दाखविण्यात आले असून त्यांचे नावे ४६ हजार ७०० रूपये उचलण्यात आले आहेत.