रोजगार हमी योजनेतील रोपांचे होणार ‘आॅडिट’

By Admin | Updated: September 8, 2014 23:29 IST2014-09-08T23:29:09+5:302014-09-08T23:29:09+5:30

रोजगार हमी योजनेतून लावण्यात आलेली रोपे जगली, किती रोपे मृत झाली. नवीन रोपे लावता येणे शक्य आहे काय? याची तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मागील तीन वर्षांतील

Employment Guarantee Scheme will be organized by 'Audit' | रोजगार हमी योजनेतील रोपांचे होणार ‘आॅडिट’

रोजगार हमी योजनेतील रोपांचे होणार ‘आॅडिट’

अमरावती : रोजगार हमी योजनेतून लावण्यात आलेली रोपे जगली, किती रोपे मृत झाली. नवीन रोपे लावता येणे शक्य आहे काय? याची तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मागील तीन वर्षांतील रोपांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
त्यानुसार सामाजिक वनीकरण विभागाच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या मदतीने २५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत काम पूर्ण कराण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, रोपे लागवडीच्या कामाची तपासणी केली जाणार असल्याने जिल्हा परिषदेतील अधिकारी ग्राम पंचायतीची माहिती गोळा करण्याच्या कामे कमी असल्याने दोन ते तीन दिवसांत नियोजन पूर्ण होण्याची शक्यता आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून कामे करुन घेण्याचा ट्रेड अलीकडे कमी होत चालला आहे. या योजनेमधील सर्व कामांची नोंद आॅनलाईन ठेवावी लागते. कामावरुन राजकारण व वाद होण्याचे प्रकारही सातत्याने घडत असतात. कमी मजुरी मिळत असल्यामुळे रोजगार हमीची कामे करण्यास मजूरही मिळत नाहीत. या अडचणी भेडसावत असल्याने यंत्राच्या मदतीने थोड्या वेळातच कामे उरकून घेण्याकडे कल वाढू लागला आहे. योजनेतून आलेल्या रोपे लागवडीसारख्या कामांची माहितीच ठेवली जात नसल्याची बाबही सातत्याने उघड झाली आहे.
आताही शतकोटी वृक्ष लागवड योजनेतील कामांमध्ये रोहयोची झिकझिक टाळून सर्रास यंत्राच्या मदतीने कामे करुन घेतली आहेत. मागील वर्षी व चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेत समाधानकारक रोप लागवडीची कामे झाली नाही. योजनेची अटी विदारक स्थिती झाली असताना शासनाने पुन्हा या योजनेतून लावण्यात आलेल्या रोपांचे आॅडिट करण्याचा फंडा शोधून काढला आहे. रोजगार हमी विभागाच्या सचिवांनी या बाबत परिपत्रक काढून योजनेतून तीन वर्षांत किमी ग्रा.पं.ने रोपे लावली. त्यातील किती जगली व किती रोपे मेली. नव्या ठिकाणी रोपे लावता येणे शक्य आहे काय आदींची माहिती घ्यावी लागणार आहे. यासाठी राष्ट्रीय हरित सेनेच्या २५० शाळांतील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाईल. जि.प.चे सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून ग्रा.पं.ची निवड करुन याची माहिती विद्यार्थी व शिक्षकांना दिली जाणार आहे. विद्यार्थी रोपांची पाहणी करुन त्यांची माहिती गोळा करणार आहे.

Web Title: Employment Guarantee Scheme will be organized by 'Audit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.