९२ हजार युवकांना कधी मिळणार रोजगार!

By Admin | Updated: March 16, 2017 00:06 IST2017-03-16T00:06:54+5:302017-03-16T00:06:54+5:30

संत गुलाब महाराज जन्मभुमीला अर्थसंकल्पात आपल्या पाठपुराव्या नंतर निधी शासनाने उपलब्ध करून दिला़

Employment of 92 thousand youth will get employment! | ९२ हजार युवकांना कधी मिळणार रोजगार!

९२ हजार युवकांना कधी मिळणार रोजगार!

आ़ वीरेंद्र जगताप यांचा सवाल : अर्थसंकल्पीय अधिवेशनात १४२ प्रश्न
अमरावती : संत गुलाब महाराज जन्मभुमीला अर्थसंकल्पात आपल्या पाठपुराव्या नंतर निधी शासनाने उपलब्ध करून दिला़ आता अमरावती विभागातील ९२ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणारे ५ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या उद्योगांचे शासन स्तरावर अडकलेल्या प्रस्तावांना त्वरीत मान्यता देण्याची मागणी आ़वीरेंद्र जगताप यांनी केली आहे़
सध्या सुरू असलेल्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात धामणगाव विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक हिताचे १४२ तारांकीत, ४९ लक्षवेधी, ३ कपात सूचना मांडल्या आहेत़ शेतकऱ्यांना मागील वर्षीपेक्षा सोयाबीन, तूर, मुग, उडीद, हरबरा, कपाशी या पिकाला कमी मिळालेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत भाव गरजेचा तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी पहिल्या आठवड्यात आ़ जगताप यांनी सभागृहात केली़ ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक वर्ग २ ची पदे मागील १२ वर्षापासून रिक्त आहे़ ओबीसी बांधवांच्या घरकुलासाठी निधी नाही. इंदिरा घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना भुखंड नसल्याने त्यांचे प्रश्न ‘जैसे थे’आहे़ नागपूर-मुंबई दरम्यान होणारा समृध्दी प्रकल्पाचा शेतकऱ्यांना विश्वासात घेवून निर्णय घेतला जात नाही़ मागील दोन वर्षापासून अल्पसंख्यांक वस्तीसुधार योजनेअंतर्गत शासनाने निधी दिला नाही. त्यामुळे या अधिवेशनात निर्णय घेण्याची मागणी आ़ वीरेंद्र जगताप यांनी केली आहे़
धामणगावात तहसील कार्यालयाच्या ईमारतीवरील दुसऱ्या माळ्यावर उपअधिक्षक भुमिअभिलेख, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या ईमारतीला मंजुरी देणे गरजेचे आहे़ नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यातील पारधी वस्ती जोड रस्ते कामाकरीता निधी देणे आदी मागण्या आ़ वीरेंद्र जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्या आहे़ (प्रतिनिधी)

निराधार लाभार्थ्यांना हवे दीड हजार रूपये मानधन
श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार योजनेअंतर्गत महागाईच्या काळात वृध्द, अपंग, विधवा लाभार्थ्यांना ६०० रूपये अर्थसहाय्य अत्यंत अपूरे पडत असून दीड हजार रूपये प्रतीमहा अर्थसहाय्य देण्याची मागणी आ़ जगताप यांनी केली आहे़ तालुकास्तरावील आदिवासी विद्यार्थ्यांकरीता स्वतंत्र्य वस्तीगृह, ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर येथील विश्रामगृहाचे नुतनीकरण, घुईखेड, मंगरूळ चव्हाळा, वरूड बगाजी, शेंदुरजना खुर्द, वेणी गणेशपूर येथील प्राथमिक आरोग्य कर्मचारी भरण्याची मागणी त्यांनी केली आहे़

Web Title: Employment of 92 thousand youth will get employment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.