शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर तिजोरी रिती !

By admin | Updated: September 18, 2016 00:12 IST

मालमत्ता करासह अन्य स्त्रोताव्दारे अमरावतीकरांच्या खिशातून पालिकेची तिजोरी भरली जात असताना ...

महापालिकेतील महाघोळ : आगाऊ वेतनवाढीचा भुर्दंड अमरावती : मालमत्ता करासह अन्य स्त्रोताव्दारे अमरावतीकरांच्या खिशातून पालिकेची तिजोरी भरली जात असताना कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य वेतनवाढीवर ती रिती केल्या जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २००८ अन्वये एलएसजीडी अथवा एलजीएस परिक्षा उत्तीर्ण केल्यामुळे तो कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र असल्याचे ग्राह्य धरावे, अशी तरतूद आहे. मात्र अशा कर्मचाऱ्यांना एक किवा दोन वेतनवाढी कशा देण्यात आल्या ,असा प्रश्न लेखापरिक्षकांनी उपस्थित केला आहे. आर.एस .चिंचमलातपुरे, अविनाश तराळे ,जी.एस .मिराजी आणि बी.एस. पुसदकर यांना चार आगाऊ वेतनवाढी देण्यात आल्या. या चार कर्मचाऱ्यांच्या चार वेतनवाढीबाबत उल्लेख नसताना वेतनवाढी देण्याचे प्रयोजन काय,त्याबाबत प्राधिकार आणि अधिनियम दर्शवावा, अशी सूचना करण्यात आली. एक किवा दोन आगाऊ वेतनवाढी देणे १ जानेवारी २००६ नुसार बंद केल्या आहेत. राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित विनाअनुदानित शाळा , जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपरिषद ,ग्रामपंचायत येथे कुठल्याही कार्यालयात १ जानेवारी २००६ नंतर आगाऊ वेतनवाढी देण्यात आल्या नाहीत. अपवाद केवळ अमरावती महापालिकेचा. महानगरपालिकेने सदर कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी कोणत्या नियमानुसार दिल्यात, शासनाचे कोणतेही आदेश नसताना आगाऊ वेतनवाढी कशा दिल्या, याबाबत सकारण खुलासा करावा,असे आदेश होते.मात्र पालिकेकडून विहित कालावधीत कुठलाही खुलासा सादर करण्यात आला नाही.जी.एस.मिराजी यांची १ जानेवारी २००६ रोजी केलेली वेतननिश्चिती चुकीची असल्याचा आक्षेप यात आहे. मिराजी यांना जादा वेतन देण्यात आले. त्यांचेकडून ती रक्कम वसूल करुन शासनाकडे भरणा करावा, अशी सुचना लेखापरिक्षण अहवालातून करण्यात आली आहे. चारही कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ व चुकीच्या वेतन निश्चितीमुळे झालेल्या अतिप्रदानाची रक्कम संबंधिताकडून वसूल करण्याचे निर्देश यातून देण्यात आले आहे. यासंदर्भात लेखापरिक्षण पथकाला माहिती सूध्दा देण्यात आली नाही. तत्कालीन वेळी कनिष्ट लिपिक असलेल्या जी.एस.मिराजी यांना फेब्रुवारी २०११ मध्ये नियमबाह्यरित्या एक अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आल्याचा ठपका यात ठेवण्यात आला आहे. शासनाचे कोणतेही आदेश नसताना सदर वेतनवाढ कोणत्या शासनआदेशान्वये देण्यात आली, याबाबत खुलासा करावा व देण्यात आलेल्या वेतनवाढी आणि त्यावरील भत्त्याची परिगणना करुन वसूली करण्यात यावी,असे निर्देश आहेत. त्या दृष्टीने आता महापालिका यंत्रणेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिल्यानंतर अधिनियम २००८ मधील नियम ९ व १० नुसार शारिरीक पात्रता प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल घेतलेले दिसून आले नाही,असे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. उक्त अधिनियमाच्या नियम ८ नुसार भाषा परिक्षा, विभागीय परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असताना वेतनवाढी आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आल्याचे लेखापरिक्षकांनी म्हटले आहे.