शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपीसी’अभावी कर्मचा-यांची पदोन्नती रखडली,  पदोन्नतीची आशा धूसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 22:39 IST

 अमरावती : राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी वर्षातून दोनदा होणारी पदोन्नती समितीची बैठक (डीपीसी) झालेली नाही. अशातच सध्या न्यायालयात आरक्षणाबद्दल निर्णय प्रलंबित असल्याचा फटका राज्यातील हजारो कर्मचाºयांना बसला आहे.राज्य शासनाच्या सेवेतील विविध विभागांमध्ये सुमारे १९ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. वर्ग १ ते ४ पर्यंतच्या या कर्मचाºयांना सेवाज्येष्ठता यादी किंवा ...

 अमरावती : राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी वर्षातून दोनदा होणारी पदोन्नती समितीची बैठक (डीपीसी) झालेली नाही. अशातच सध्या न्यायालयात आरक्षणाबद्दल निर्णय प्रलंबित असल्याचा फटका राज्यातील हजारो कर्मचाºयांना बसला आहे.

राज्य शासनाच्या सेवेतील विविध विभागांमध्ये सुमारे १९ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. वर्ग १ ते ४ पर्यंतच्या या कर्मचाºयांना सेवाज्येष्ठता यादी किंवा आकृतिबंधातील रिक्त कोट्यानुसार पदोन्नती देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागात संवर्गनिहाय पदोन्नती समिती कार्यरत आहे. शासन नियमानुसार अशा समितीला रिक्त पदांचा आढावा घेऊन वर्षभरात दोनदा पदोन्नती समितीची बैठक घेणे सक्तीचे आहे. साधारणत: आॅगस्ट व मार्च या महिन्यांत पदोन्नती समिती बैठक बोलावली जाते. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावर  सर्वोच्च न्यायालयात अद्याप निर्णय झाला नाही, तर सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत कुठलेही मार्गदर्शन नसल्यामुळे राज्यात ३९ विभागांनी अप्रत्यक्ष पदोन्नती समिती बैठकीला ब्रेक लावले. यामुळे दिवाळीनंतर होणारे प्रमोशन रखडले आहे. याचा फटका राज्यातील वर्ग २ आणि ३, ४ च्या कर्मचाºयांना बसला आहे. सर्वोच्च न्यायालयात नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर खटला सुरू असताना डीपीसीच्या बैठकींना ब्रेक लावण्याची शक्कल कोणी लढवली, हा संशोधनाचा विषय आहे. राज्यात विविध विभागांतील सुमारे नऊ हजार कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित असल्याचे वास्तव आहे.

 आकृतिबंधात सावळागोंधळशासकीय कर्मचाºयांना पदोन्नती देताना त्या-त्या विभागाला आकृतिबंधानुसार पदोन्नतीचा कोटा ठरवावा लागतो. मात्र, अनेक विभागांमध्ये आकृतिबंधाचा ताळमेळ जुळत नाही. काही वर्गांना खुल्या प्रवर्गात बसवून पदोन्नती दिली गेली तर काही वर्गाचे उमेदवार न मिळाल्यामुळे आकृतिबंधात कोटा रिकामाच दर्शविला गेला. त्यामुळे आकृतिबंधाचा सावळागोंधळ आहे.

 सुपर क्लास वन अधिका-यांचा मार्ग मोकळा राज्यातील वर्ग २ ते ४ च्या कर्मचा-यांच्या पदोन्नतीच्या धोरणास डीपीसीची बैठक झालेली नसल्याने ब्रेक लागला आहे. मात्र, सुपर क्लास वन अधिका-यांचा पदोन्नतीचा मार्ग मंत्रालयस्तरावर डीपीसीची बैठक घेऊन मोकळा झाला आहे. बैठक झाली नसल्याचा सर्वाधिक फटका वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांच्या पदोन्नतीला बसलेला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र