कर्मचारी शिक्षकांच्या घरभाडे वसुलीचा मुद्दा तापला
By Admin | Updated: May 24, 2015 00:27 IST2015-05-24T00:27:11+5:302015-05-24T00:27:11+5:30
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कर्मचारी व शिक्षकांच्या घरभाडे वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

कर्मचारी शिक्षकांच्या घरभाडे वसुलीचा मुद्दा तापला
सीईओंशी चर्चा : प्राथमिक शिक्षक संघाची स्थगितीची मागणी
अमरावती : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कर्मचारी व शिक्षकांच्या घरभाडे वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या वसुलीस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी अखिल अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षण संघाच्यावतीने सरचिटणीस किरण पाटील यांच्या नेतुत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
अमरावती पंचायत समितीच्या २३ आॅगस्ट २०१३ रोजीच्या मासीक सभेत मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करूण घरभाडे भत्ता अदा न करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला होता.परंतु पंचायत समितीने याबाबत चौकशी न करताच सरसकट सर्वच कर्मचाऱ्याचा घरभाडे भत्ता आॅगस्ट महिन्यापासून बंद केले आहे.यानुसार आॅगस्ट २०१३ मध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षक मुख्यालयी राहत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्राथमीक शिक्षक संघाचे वतीने तत्कालीन गटविकास अधिकारी दिलीप मानकर यांना निवेदन देवून घरभाडे भत्ता पुनश्च सुरू करण्याबाबत चर्चा केली. व त्यांनी विना चौकशी घरभाडे भत्ता बंद करण्याचे मान्य करूण आॅक्टोबर २०१३ पासून घरभाडे, भत्ता सुरू करण्याचे मान्य केले होते.त्यानंतर विद्यमान गटविकास अधिकारी यांनी केंद्रप्रमुखां मार्फत क्रॉस चेकींग करूण खात्री पटल्यानंतरच घरभाडे भत्त्याची थकबाकी अदा केलेली होती.तसेच पंचायत समितीच्या २४ डिसेंबर २०१३ च्या मासिक सभेत सुध्दा घरभाडे भत्ता पूनश्च सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.विशेष म्हणजे उपरोत संदर्भातील आदेशामध्ये सुध्दा शाळा व्यवस्थापन समितीस घरभाडे भत्ता प्रदान करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे.हे मान्य केले आहे.करिता सदर थकबाकी वसुल करणे ही बाब अन्याय कारक असल्याने या निर्णया बाबत पूर्नविचार करावा अशी मागणी प्राथमीक शिक्षक संघाने यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन भंडारी यांनी दिले. निवेदन देतेवेळी सरचिटणीस किरण पाटील, पंडीत देशमुख, राजेंद्र होले, व प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)