कर्मचारी संघटनेच्या सदस्यांचा राजीनामा
By Admin | Updated: May 27, 2016 00:51 IST2016-05-27T00:51:08+5:302016-05-27T00:51:08+5:30
नगर परिषद तुमसर येथे कार्यरत महाराष्ट्र राज्य पालिका कर्मचारी व संवर्ग संघटनेच्या ३० सदस्यांनी एकाचवेळी सामूहिक राजीनामा दिला आहे.

कर्मचारी संघटनेच्या सदस्यांचा राजीनामा
तुमसर : नगर परिषद तुमसर येथे कार्यरत महाराष्ट्र राज्य पालिका कर्मचारी व संवर्ग संघटनेच्या ३० सदस्यांनी एकाचवेळी सामूहिक राजीनामा दिला आहे.
तुमसरमध्ये काही महिन्यापूर्वी पासून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबाबत सदस्यात असंतोष होता. ३० सदस्यांनी पदाचा राजीनामा देऊन संघटनेमार्फत होणाऱ्या आंदोलनात सहभागी राहणार नसल्याचे म्हटले आहे. भारत मेश्राम, भाऊराव गजभिये, युवराज बडवाईक, निशीध शुक्ला, महेश बुरडे, प्रकाश मारवाडे, शिवचरण पांडे, राम बडवाईक, अविनाश भिसे, राजेश बेदरकर, माधोराव डोंगरे, गौरीशंकर तिवारी, मांगो बबाले, अ.शेख, सुभाष वैद्य, प्रकाश साखरवाडे, मदन कामथे, देवराव किरपाने, नरेश भोंडेकर, अनिल भोंडेकर, मोरेश्वर कापसे, मुकुंद गौर, सिद्धेश्वर जोगे, देवाजी कुकडे यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)