काँटॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढविण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST2021-02-23T04:20:06+5:302021-02-23T04:20:06+5:30

महापालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी. ज्या व्यक्तींना ...

Emphasis on increasing contact tracing, testing | काँटॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढविण्यावर भर

काँटॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढविण्यावर भर

महापालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी. ज्या व्यक्तींना शुगर, बीपी आहे, अशा व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. सध्या राज्यात सर्वाधिक रुग्ण अमरावती शहरात नोंद होत आहे. बाहेरच्या व्यक्तींनी शक्यतोवर शहरात येण्याचे टाळावे. नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, गर्दी टाळावी व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसह त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आयुक्त रोडे यांनी केले आहे.

शहरात सध्या मास्क नसणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणे याबाबत दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. प्रशासन सर्व उपाययोजना करीत असले तरी कोरोनाची साखळी खंडित करणे यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.

बॉक्स

सुपर स्प्रेडरनी कराव्या चाचण्या

ज्या व्यक्तींचा अधिकाधिक लोकांशी संपर्क येतो, अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींनी चाचण्या करून घ्याव्यात. त्यांच्यासाठी स्वॅब केंद्रांची सुविधा आहे. सध्या कुटुंबचे कुटुंबच पॉझिटिव्ह येत आहेत. यासाठी चाचण्या वाढविण्यावर अधिक भर देण्यात आलेला आहे. याशिवाय नागरिकांनी स्वत:हूनही चाचण्या करण्याचे आवाहन आयुक्त रोडे यांनी केले आहे.

बॉक्स

होम आयसोलेशन रुग्णांवर वॉच

होम आयसोलेशन रुग्णांनी बाहेर येऊन संसर्ग वाढवू नये, यासाठी त्यांच्यावर नियंत्रण कक्षाद्वारे वॉच ठेवला जात आहे. असा रुग्ण घराबाहेर दिसल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आता संचारबंदीचे आदेश बजावले आहेत. त्याचे पालन करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Web Title: Emphasis on increasing contact tracing, testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.