मुख्य मार्गावरील अतिक्रमण निर्मूलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:01 IST2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:01:06+5:30
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच शहरातील अनेक चौकांत व मुख्य रस्त्यावर व्यवसाय थाटून अनेकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या आदेशानुसार योगेश कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल भारत बघेल, अमोल पान्हेकर आदी सहभागी झाले.

मुख्य मार्गावरील अतिक्रमण निर्मूलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील रेल्वे स्टेशन, इर्विन चौक, चित्रा चौक, जयस्तंभ चौक, प्रभात चौक, बापट चौक, नगर वाचनालय, श्याम चौक, राजकमल चौक, गर्ल्स हायस्कूल ते डी-मार्ट या मुख्य रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने शनिवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या विशेष पथकाद्वारे काढण्यात आली.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच शहरातील अनेक चौकांत व मुख्य रस्त्यावर व्यवसाय थाटून अनेकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या आदेशानुसार योगेश कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल भारत बघेल, अमोल पान्हेकर आदी सहभागी झाले. याशिवाय दस्तुरनगर, फरशी स्टाप, बायपास या भागात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत ११ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. फिजिकल डिस्टन्सिंग नसल्याबाबत तीन आस्थापनांना प्रत्येकी तीन हजारांचा दंड ठोठावण्यात आला. चेहऱ्यावर मास्क नसल्याने आठ जणांना प्रत्येकी ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हाडोळे आदी मोहिमेत सहभागी झाले होते.