अतिक्रमण निर्मूलन थातूरमातूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:53+5:30
शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या धाकाने ९० टक्के दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत: काढले. दोन दिवसांत चांदूर रेल्वे नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन शहरात केवळ फेरफटका मारीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुना मोटर स्टॅँड चौकात तसेच मुख्य मार्केटमध्ये अनेक दुकानदारांनी सिमेंट ओटे, पायऱ्या, एवढेच नाही तर पेव्हर बसवून अतिक्रमण केले, एकाने रस्त्यावर विटांचा ढिग मांडला.

अतिक्रमण निर्मूलन थातूरमातूर
चांदूर रेल्वे : शहरात दोन दिवस राबविण्यात आलेले अतिक्रमण निर्मूलन फार्स ठरल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गरिबांचे अतिक्रमण काढताना जोश दिसला, तर श्रीमंतांचे अतिक्रमण हटविताना तो गायब होता.
शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या धाकाने ९० टक्के दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत: काढले. दोन दिवसांत चांदूर रेल्वे नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन शहरात केवळ फेरफटका मारीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुना मोटर स्टॅँड चौकात तसेच मुख्य मार्केटमध्ये अनेक दुकानदारांनी सिमेंट ओटे, पायऱ्या, एवढेच नाही तर पेव्हर बसवून अतिक्रमण केले, एकाने रस्त्यावर विटांचा ढिग मांडला. या अतिक्रमणावर नगरपालिकेचा बुलडोजर चालला नाही; उलट आठवडी बाजारात कोंबडी विक्रेत्यांचे लोखंडी कठडे, ठेल्यावर पथकाचा चांगलाच रोष दिसला. तेथून हलविण्याची संधी न देताच ठेले भुईसपाट करण्यात आले. मच्छी विक्रेत्यांचे मातीचे ओटे जेसीबीने खोदून काढले. एकीकडे मोठे दुकानदारांना सॉफ्ट कॉर्नर तर हातगाडीवाले, भाजीपाल्यांवर रोब दाखवितांना दिसले. त्यामूळे गरीबांना मायबाप नसल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. तर त्याचवेळी श्रीमंतासाठी पायघड्या अशी स्थिती यावेळी दिसून आली.