वन्यप्राण्यांपासून त्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:09 IST2019-02-01T23:09:09+5:302019-02-01T23:09:27+5:30

अगोदरच नापिकी, दुष्काळ आणि उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. अशातच वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून त्रस्त असलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी शुक्रवारी वनविभागाचे कार्यालय गाठले. वनाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन सादर करून व्यथा मांडल्या.

Elgar of stricken farmers from wildlife | वन्यप्राण्यांपासून त्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार

वन्यप्राण्यांपासून त्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार

ठळक मुद्देडीएफओ कार्यालयावर धडक : नुकसानभरपाई मिळण्याची मागणी

अमरावती : अगोदरच नापिकी, दुष्काळ आणि उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. अशातच वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून त्रस्त असलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी शुक्रवारी वनविभागाचे कार्यालय गाठले. वनाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन सादर करून व्यथा मांडल्या.
येथील इर्विन चौक ते उपवनसंरक्षक कार्यालय दरम्यान शेतकºयांनी मोर्चा काढला. मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनातून किसान एकता मंचने वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची व्यथा मांडली. सन १९७२ साली वन्यजीव संरक्षण कायदा लागू झाला. त्याअनुषंगाने वन्यजीवांची संख्या वाढली. मात्र,जंगलाशेजारील शेतीत वन्यप्राण्यांमुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. हरिण, रोही, रानडुक्कर, माकडं आदी वन्यप्राणी शेतात धुमाकूळ घालत असल्याने उभे पिक फस्त करतात. अलीकडे शेतकरी चौफेर आर्थिक संकटात सापडला असताना, वन्यप्राण्यांपासूनदेखील त्रस्त झाला आहे. शेतात वन्यप्राण्यांनी नुकसान केल्यास त्याची भरपाई वर्ष, दोन वर्षे मिळत नाही. कर्ज उभारून शेती करण्याचे संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या नुकसानतून शेतकºयांना मुक्तता मिळावी, अशी मागणी करण्यात आली. वन्यजीवांचे संरक्षण झाले पाहिजे मात्र, शेतकरी देखील जगावा ही अपेक्षा किसान एकता मंचने व्यक्त केली. जंगल क्षेत्राच्या प्रमाणात जनावरांची उपलब्धता तपासून ही आकडेवारी निश्चित करावी, जंगल शेजारील शेताला कुंपण मिळावे, यासाठी निधी उपलब्ध करु न द्यावा, पिक नुकसानीचे सर्वे करण्यात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची कमिटी निश्चित करण्यात यावी, शेतकºयांच्या पिकांचे नुकसानीची मदत वाढवून ती १५ दिवसांत मिळावी, अशी नियमावली लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी किसान एकता मंचचे संजय कोल्हे, राजेंद्र पारिसे, नगरसेवक दिनेश बुब, सिद्धार्थ वानखडे, नंदकिशोर कुवटे, राजीव तायडे, सतिश पुरी आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Elgar of stricken farmers from wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.