भंगार एसटी बसविरोधात एल्गार

By Admin | Updated: September 11, 2014 23:11 IST2014-09-11T23:11:35+5:302014-09-11T23:11:35+5:30

जिल्हयात राज्य परीवहन महामंडळा मार्फ त धावणाऱ्या भंगार एस टी बसेसमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून रस्त्यावर धावणाऱ्या भंगार एसटी बसेसविरोधात गुरूवारी

Elgar against scrap ST bus | भंगार एसटी बसविरोधात एल्गार

भंगार एसटी बसविरोधात एल्गार

आंदोलन : परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन, अधिकाऱ्यांना विचारला जाब
अमरावती : जिल्हयात राज्य परीवहन महामंडळा मार्फ त धावणाऱ्या भंगार एस टी बसेसमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून रस्त्यावर धावणाऱ्या भंगार एसटी बसेसविरोधात गुरूवारी आक्रमक भूमिका घेत भाजपा युवा मोर्चातर्फे राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला .
शहरासह ग्रामीण भागात लाखो प्रवाशांची वाहतुक करणाऱ्या जिल्हयातील भंगार एस टी बसेसची संख्या मोठी आहे . भंगार एस टी बसेस मुळे . एस टी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . यापुर्वी जिल्हयातील रस्त्यावर धावणाऱ्या भंगार एस टी बसेस बंद करण्यात याव्यात यासाठी विविध राजकीय पक्ष यांनी निवेदने दिलीत. मात्र याकडे दुर्लक्ष करून परीवहन महामंडळाने भंगार बसेस सोडणे सुरूच ठेवले. विशेष म्हणजे काही दिवसापुर्वी भाजपा युवा मोर्चा तर्फे परीवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते . तरीही या निवेदनाची दखल घेण्यात न आल्याने मागील ५ सष्टेंबर रोजी चांदुर बाजार ते सुरळी गावा नजीक भंगार एस टी बस झाडावर आदळली या अपघातात ३० जन जखमी तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत.सदर अपघातात जखमी मध्ये शाळकरी विद्यार्थ्याची मोठी संख्या आहे . हा अपघात राज्य परीवहन महामंडळाने भंगार एस टी बसेस रस्त्यावर सोडणे बंद न केल्यामुळे घडल्याचा आरोप भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे भंगार एस टी बसेस बंद करण्याच्या संदर्भात परीवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिलेल्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याचे हे उदारण आहे. त्यामुळे सध्या भंगार एस टी बसेस मुळे अपघात घडत आहेत परीणामी प्रवाशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत आहे या प्रार्श्र्वभूमविर जिल्हयात धावत असलेल्या भंगार एस टी बसेस त्वरीत बंद कराव्यात अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महासचिव पंकज विलेकर,सोपान कनेकर,अमोल काळे अक्षय मेहरे,प्रतिक रावेकर ,जुबेर सिध्दीकी,अभिलाष पाटील,अनिकेत आष्टोनकर,सचिन पाटील ,किशोर काळे,राजेश हेडाऊ आदीनी केली आहे.

Web Title: Elgar against scrap ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.