नांदगावात मुस्लिमांचा शासनाविरुद्ध एल्गार
By Admin | Updated: October 19, 2016 00:22 IST2016-10-19T00:22:00+5:302016-10-19T00:22:00+5:30
आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाजाचे मोठे मोर्चे निघत असताना आता मुस्लिम समाजानेसुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी शासनविरोधी एल्गार पुकारला आहे.

नांदगावात मुस्लिमांचा शासनाविरुद्ध एल्गार
आरक्षणाची मागणी : तहसीलदारांना निवेदन
नांदगाव खंडेश्वर : आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाजाचे मोठे मोर्चे निघत असताना आता मुस्लिम समाजानेसुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी शासनविरोधी एल्गार पुकारला आहे. त्याअनुषंगाने नांदगाव शहरात मार्च काढून तहसील कार्यालयावर धडक देऊन मुुस्लिम बांधवांनी आरक्षणाची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शहरातील बुधवारा चौकातून निघालेल्या मोर्चात शेकडो मुस्लिम समाज बांधवांनी सहभाग नोंदविला. आम्हीसुद्धा भारत देशातील रहिवासी असून आम्हालाही आरक्षण मिळावे, अशी मुस्लिम समाज बांधवांची प्रमुख मागणी आहे. पाच टक्के आरक्षण देऊन आम्हाला आमचा हक्क मिळावा, अशी मुस्लिम समाजाची मागणी आहे. जर तातडीने शासनाने मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणावे, हा समाज अल्पसंख्यक असून त्याला आरक्षण लागू केले नाही तर जमीयत उलेमा हिंद संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जमीयत उलेमा हिंद संघटनेचे नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष मौलाना हिस्सामुद्दीन नदवी, मौलाना कयामुद्दीन, मौलाना अब्दुल कदीर, मौलाना अब्दुल खलील, मो. जावेद, फिरोजखान, अथरखान, शोयब, वकील दानीश, मो. इस्माईल, अमजदखान, न्यामत खाँ, मो. इद्रिस, मो. साजीद, सय्यद अबरार, हारुन ठेकेदार, मो. शफी यांचेसह शेकडो मुस्लीम समाज बांधवांनी दिला. (शहर प्रतिनिधी)