आष्टी येथील देशी दारू दुकानाविरुद्ध एल्गार
By Admin | Updated: August 11, 2015 00:28 IST2015-08-11T00:28:57+5:302015-08-11T00:28:57+5:30
भातकुली तालुक्यातील आष्टी येथील देशी दारू दुकानाचा पतवाना रद्द करावा, अशी मागणी सोमवारी भाजपा पदाधिकारी ..

आष्टी येथील देशी दारू दुकानाविरुद्ध एल्गार
मागणी : भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : भातकुली तालुक्यातील आष्टी येथील देशी दारू दुकानाचा पतवाना रद्द करावा, अशी मागणी सोमवारी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
आष्टी येथील देशी दारूदुकानातून अवैध रित्या देशी दारूची विक्र ी केली जात असल्याने या ठिकाणीच गुरूदेव सेवा मंडळ आहे. दिवसेदिवस देशी दारूचा या दुकानातून अवैध व्यवसाय वाढत असल्याने यापासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली असून दारुमुळे अनेकांचे संसार काडीमोड होण्याच्या मार्गावर आहे. गावातील शांतता भंग झाली असून विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे. याशिवाय आष्टीलगतच्या परिसरातील विविध गावांत अवैध दारूचे धंदे फोफावले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी या दारू दुकानांचाच परवाना रद्द करावा, अशी मागणी यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी ग्यानदेव जवंजाळ, निवेदिता चौधरी, ज्ञानेश्र्वर जवंजाळ, काशिनाथ फुटाणे, प्रभाकर हिवराळे, रामभाऊ खरबळे, रामदास सनके, गोपाल कडू, कमलेश पारखे, शिवम जानवाडे, व अन्य नागरिक व भाजपा पदाधिकारी यांचा समावेश होता.