विदर्भातील गोवारींचा सवलतीसाठी पुन्हा एल्गार

By Admin | Updated: November 26, 2015 00:27 IST2015-11-26T00:27:04+5:302015-11-26T00:27:04+5:30

स्वातंत्र्यपूर्व काळापासून मिळणाऱ्या सवलती देण्यात याव्यात या मागणीसाठी ११४ निष्पाप आदिवासी गोवारीचे बळी ....

Elgar again for Govari concessions in Vidarbha | विदर्भातील गोवारींचा सवलतीसाठी पुन्हा एल्गार

विदर्भातील गोवारींचा सवलतीसाठी पुन्हा एल्गार

नव्या सर्वेक्षणाला स्थगिती : विधानसभेवर काढणार मोर्चा
मोहन राऊत अमरावती
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मिळणाऱ्या सवलती देण्यात याव्यात या मागणीसाठी ११४ निष्पाप आदिवासी गोवारीचे बळी जाऊनही २१ वर्षाच्या काळात राज्यातील ३६ लाख गोवारीची झोळी रिकामीच राज्य शासनाने राज्य शासनाने मानववंश शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली़ मात्र या नव्या सर्वेक्षणालाही स्थगिती मिळाली आहे़ विदर्भातील गोवारांनी सवलतीसाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे़
शहीद गोवारी दिन नुकताच नागपूर येथे पार पडला यावेळी विवीध संघटनांची बैठक पार पडली आजही गोंडगोवारी यातील स्वल्पविराम न टाकल्याची दिल्लीतील वातानुकूलित कक्षात बसलेल्या संधी अधिकाऱ्यांच्या चुकीचे चटके या समाजाला आजही बसत आहे़ २१ वर्षा आपल्याला न्याय मिळेल अशी आस लावून राज्यातील गोवारी बांधव बसला आहे़ मात्र आजही कोणतेच विकासाचे पाऊल उचलली नसल्याची खंत राज्यातील ३६ लाख गोवारी बांधवात आहे़
पुरावे देऊनही अन्याय
गोवारी ही मुळची आदिवासी जमात १० सप्टेंबर १९५६ रोजी अनुसूचित जमातीत गोवारी ऐवजी गोंडगोवारी असा शब्द अंतर्भूत करण्यात आला़ आणि सर्व गोवारींना २३ एप्रिल १९८५ पर्यंत गोवारींनाही गोंडगोवारी अशी प्रमाणपत्रे बहाल करण्यात आली़ परंतू २४ एप्रिल १९८५ रोजी काँग्रेस शासनाने एक शासकीय अद्यादेश काढून गोवारींना अनुसूचित जमातीच्या मिळणाऱ्या सवलती काढून घेतल्या़ तेव्हापासून हा समाज आपल्या हक्कासाठी लढा देत आहे़ एकीकडे या आदिवासी गोवारींची दुसरी पिढी सवलतीसाठी संघर्ष करीत गारद झाली तर दुसरीकडे या गोवारींना सवलती मिळूनये म्हणून राज्यातील काही आदिवासीचे खासदार आमदार विरोध करीत असल्याचा आरोप आदिवासी गोवारी युवकांक डून होत आहे़ विशेषत: या आदिवासी गोवारी जमातीचे अस्तित्व स्वातंत्र्य पूर्वकाळापासून आहे़ १८६९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या जनगणनेत गोवारी भाषा बोलनाऱ्यांची संख्या २ हजार ५१७ असल्याची नोंद इतिहासात आहे़ मार्टीन यांनी दिलेल्या अहवालात गोवारी आदिवासी जमात असल्याची नोंद आहे़

Web Title: Elgar again for Govari concessions in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.