वीजपुरवठा न करताच विद्युत देयक पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:20+5:30
मजुरी करून कशीबशी आपली उपजीविका व्यतीत करणाऱ्या सोनकली यांनी दोन वर्षांपूर्वी घरगुती वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कालावधीत त्यांच्या घरी वीजपुरवठा होऊन बल्ब लागला नाही. मात्र, महावितरण अधिकारी नित्यनेमाने दरमहा देयक देत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

वीजपुरवठा न करताच विद्युत देयक पाठविले
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : महावितरणने दोन वर्षांपासून घरगुती वीज जोडणीची मागणी प्रलंबित ठेवली; मात्र दोन महिन्यांचे हजारो रुपयांचे वीज देयक पाठविले. यामुळे ६५ वर्षे वृद्धेवर विचित्र स्थिती ओढवली आहे.
सदर वृद्धेने मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढ्यात आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत कैफीयत मांडली आहे. त्यानुसार, तालुक्यातील सुसर्दा येथील सोनकली नानकराम कासदेकर असे अन्यायग्रस्त वृद्धेचे नाव आहे. तिला कोणाचाही आधार नाही. पती वारले आहेत. मुलगा बाहेरगावी कामास गेल्यानंतर ढुंकूनही पाहत नसल्यामुळे मजुरी करून कशीबशी आपली उपजीविका व्यतीत करणाऱ्या सोनकली यांनी दोन वर्षांपूर्वी घरगुती वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कालावधीत त्यांच्या घरी वीजपुरवठा होऊन बल्ब लागला नाही. मात्र, महावितरण अधिकारी नित्यनेमाने दरमहा देयक देत असल्याचा प्रकार उघडकीस आला. ज्याला विजेची गरज आहे, त्याला बिल देऊन कसली बोळवण करता, असा थेट प्रश्न त्यांनी महावितरणला केला आहे.