विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात विद्युत कर्मचारी

By Admin | Updated: July 22, 2016 00:33 IST2016-07-22T00:33:31+5:302016-07-22T00:33:31+5:30

विद्युत वितरण कंपनी अमरावती परिमंडळाचे अधिक्षक अभियंता यांनी चर्चेदरम्यान दिलेल्या विविध मागण्याच्या आश्वासनानुसार आदेश निर्गमीत केले नाहीत.

Electricity employees against the power distribution company | विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात विद्युत कर्मचारी

विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात विद्युत कर्मचारी

आंदोलन : आश्वासनाचे पालन नाही
अमरावती : विद्युत वितरण कंपनी अमरावती परिमंडळाचे अधिक्षक अभियंता यांनी चर्चेदरम्यान दिलेल्या विविध मागण्याच्या आश्वासनानुसार आदेश निर्गमीत केले नाहीत. त्यामुळे याविरोधात महाराष्ट्र राज्य स्वाभिमानानी विद्युत कर्मचारी फेडरेशनच्या नेतुत्वात १४ जुलै पासून वीज कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. यानंतरही आदेश न दिल्याने प्रशासनाचा निषेध करण्यासाठी बुधवार २० जुलै रोजी अमरावती परिमंडळातील शेकडो कामगारांनी विद्युत भवनासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले.
यावेळी स्वाभिमानी विद्युत कर्मचारी फेडरेशनचे अध्यक्ष पी.बी.उके यांनी संबोधित केले. यावेळी विज कामगारांचा लढा त्याच्या हक्कासाठी आहे. काही दिवसांपासून कामगार बांधव याठिकाणी उपोषण करीत आहेत. मात्र वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांनी शिष्टमंडळा सोबत केलेल्या चर्चेनुसार कामगारांच्या मागणीचे आदेश काढण्यात चालढकल होत आहे, असे उके म्हणाले. जोपर्यत कामगारांच्या मागणीचा आदेश निर्गमित होणार नाही तोपर्यत माघार घेणार नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सी.एस.बानुबाकोडे, एस.एम.खोले, सरचिटणीस राजेश कठाळे, सुनील देशमुख कोषाध्यक्ष देवेंद्र तवर, विनोद गोरले, सुभाष मारोडकर, अविनाश डहाके, दीपक विधळे, अतुल पिंगळे आदींनी मार्गदर्शन केले. आंदोलनात अरविंद मोरे, श्रीधर वानखडे, रवि ठाकरे, पी.टी. खंडारे, नीलेश कदम, मुकेश मोरे, धीरज पांडे,संजय कुकडे, धनश्याम नाथे, अनिल मेश्राम, गजनान धुंदी, राजेंद्र पाटणकर,दिलीप कारमोरे, बबन गायकी, तुषार खाडखुईकर, नीलेश बोबडे नरेंद्र चिमोटे, गोपाल घोटकर, सुनील लाखोड आदी उपस्थित होते.

Web Title: Electricity employees against the power distribution company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.