पहिल्याच पावसात वीज कंपनीची पोलखोल

By Admin | Updated: June 19, 2014 23:34 IST2014-06-19T23:34:56+5:302014-06-19T23:34:56+5:30

मंगळवारी अमरावतीत मान्सूनचे आगमन झाले. पहिल्याच पावसाने विद्युत विभागाची पोलखोल केली. सौम्य वाऱ्यासह आलेल्या पावसानेसुध्दा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अर्ध्या अमरावतीकरांना रात्र अंधारात

The electricity company's pollution in the first rain | पहिल्याच पावसात वीज कंपनीची पोलखोल

पहिल्याच पावसात वीज कंपनीची पोलखोल

अर्ध्या अमरावतीत काळोख : वीज कंपनी करते तरी काय?
अमरावती : मंगळवारी अमरावतीत मान्सूनचे आगमन झाले. पहिल्याच पावसाने विद्युत विभागाची पोलखोल केली. सौम्य वाऱ्यासह आलेल्या पावसानेसुध्दा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अर्ध्या अमरावतीकरांना रात्र अंधारात काढावी लागली. नागरिकांकडून विजेची भरमसाठ देयके वसूल करण्यात वीज कंपनी नेहमीच अग्रेसर असते. एक महिन्याच्या थकीत देयकाकरिता ग्राहकांचा वीजपुुरवठा खंडित केला जातो. मात्र ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याकडे मात्र वीज कंपनी दुर्लक्ष करीत आहे.
उपचार सुरू असताना त्यांना लावण्यात आलेले सलाईन संपल्यानंतरही कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर व परिचारिकेकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली व त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. श्रीराम दयालकर यांचा मुलगा श्रीकांत हा सैन्यात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वीज प्रवाह सुरळीत करण्याकरिता विज कंपनीकडे मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा फौज फाटा आहे. तसेच हजारो कर्मचारीही कार्यरत आहेत. मात्र तरीही वीजपुरवठा करण्यात वीज कंपनी असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याकरिता अनेक ग्राहक वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी संपर्क करीतच राहतात. मात्र तरीही ग्राहंकांचे योग्य समाधान वीज कंपनी कर्मचारी करीत नाही, अशी ओरड नेहमीच होत आहे.
केन्द्र शासनाच्या विद्युत अधिनियम २००३ नुसार जिल्हास्तरीय विद्युतीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी अमरावती जिल्हा विद्युतीकरण समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शासनाकडूुन वीज कंपनीला आतापर्यंत १५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून विद्युतीकरणाचे कार्य युध्द स्तरावर सुरू आहे. मात्र कामात हलगर्जीपणाचे भाव विज कंपनी कर्मचारी दाखवित आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असतानाही विद्युत वितरण कंपनीचा कामकाज संथगतीने होत आहे. मागील काही दिवसांपासून मेळघाटातील काही भागात विद्युत पुरवठा खंडीत आहे.तसेच जिल्हातील काही गावामध्ये अंधार असल्याचे लोकप्रतिनिधीनी जिल्हा विद्यतीकरण समन्वय बैठकती सांगितले मात्र अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश मिळाले नाही. मंगळवारी सायंकाळनंतर अमरावतीत पावसाच्या सरी बरसल्या. पाऊस सुरु होताच अर्ध्या अमरावतीत विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सर्वत्र काळोख पसरला होता.

Web Title: The electricity company's pollution in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.