४९ ग्रामपंचायतींना निवडणुकीचे वेध
By Admin | Updated: March 18, 2015 00:19 IST2015-03-18T00:19:14+5:302015-03-18T00:19:14+5:30
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींना सध्या निवडणुकीचे वेध लागले आहेत.

४९ ग्रामपंचायतींना निवडणुकीचे वेध
लोकमत विशेष
सुमित हरकूट चांदूरबाजार
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींना सध्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. यात ४२ ग्रामपंचायतचा कार्यकाळ पुर्णत्वास येत असल्याने आणि ७ ठिकाणी पदे रिक्त असल्याने निवडणुका होत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच कोणत्याही क्षणी निवडणुका जाही0र होणार असल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमधील विशेष बाब म्हणजे उमेदवारांना आपला अर्ज आॅनलाईन भरावा लागणार आहे. हा अर्ज उमेदवाराला कोणत्याही सुविधा केंद्रावरुन भरता येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्वच संगणक सुविधा केंद्र चालकांना एक दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील गर्दी कमी होऊन सुविधा केंद्रावर गर्दी वाढणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात प्रथम मतदान केंद्रावर त्याच ठीकाणी काही तासातच निवडणुक निकाल जाहिर होणार आहे. या बद्दल ग्रामिण भागात कुतूहूल निर्माण झाले आहे.
अद्याप पर्यंत निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला नसला तरी, तालुका महसुल प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे, असे निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार सैफन नदाफ यांनी सांगीतले. यात मतदार यादी वरील हरकती व सूचना मागून अंतीम मतदार यादी प्रसिध्द करण्याचे पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. एप्रीलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. निवडणुकीसाठी गावपातळी वरील पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. त्या प्रमाणे उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. कोणत्या प्रभागात, कोणत्या समाजाची मते अधिक आहेत अशा ठिकाणी कोणता उमेदवार निवडूण येऊ शकतो किंवा प्रभागातील कोणत्या तीन उमेदवारांच्या जातीची बेरीज सर्वाधीक होऊन आपले तीनही उमेदवार कसे निवडून येऊ शकतील याचीही शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे. अपक्ष लढण्याची इच्छा असलेले उमेदवार आपले गणित जमविण्याच्या तयारीत आहे. ग्रामपंचायत निवडणूक लोकप्रतिनिधींसाठीही प्रतिष्ठेची राहाणार आहे.