शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

जिल्हा परिषदेत 'कही खुशी कही गम'; गट, गणांच्या रचनेत प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 12:09 IST

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समितीमध्ये येत्या काही दिवसात 'रणसंग्राम' होणार आहे.

ठळक मुद्देगटाची प्रारुप रचना जाहीरमतदारसंघ वाढले, पण गाव बदलले

अमरावती : जिल्हा पारषद निवडणुकीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समितीमध्ये येत्या काही दिवसात 'रणसंग्राम' होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने क्षेत्ररचना जाहीर केली. मतदारसंघामध्ये थोडाफार बदल तसेच नव्याने मतदारसंघाची भर पडली आहे. त्यासाठी नागरिकांचे आक्षेप मागविण्यात आले आहेत. त्या आक्षेपावर सुनावणी, समाधान झाल्यानंतर मतदारसंघ 'फायनल' होणार आहे.

अमरावती जिल्हा परिषदेतील बहुप्रतिक्षित वाढीव मतदारसंघांचा लेखाजोखा गुरुवारी जिल्हा प्रशासनाने गण व गटाचा प्रारूच रचना प्रसिध्द करून स्पष्ट केला. चांदूरबाजार, वरुड, धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली व अचलपूर या सात तालुक्यांमध्ये सात मतदारसंघांच्या जागा वाढल्या आहे. या वाढीव मतदारसंघांमुळे जिल्हा परिषदेच्या एकूण गटांची संख्या ६६ तर ११ पंचायत समितीची गणांची संख्या ११२ जाऊन पोहोचली आहे. नवीन वाढलेल्या गटामध्ये चांदूरबाजार तालुक्यात सोनोरी, वरुड तालुक्यात शहापूर, धारणीतील घुटी, दर्यापूरमधील माहुली धांडे, अंजनगाव सुर्जी तालुक्यात खानमपूर पांढरी, भातकुलीत निंभा तर अचलपूर तालुक्यात गौरखेडा कुंभी हा नवा मतदारसंघ तयार झाला आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या गटांसह पंचायत समित्यांच्या गणांची संख्या वाढविण्यात आल्याने त्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्या गटात आणि गणात कोणती गावे समाविष्ट राहतील याची यादी जिल्हाधिकारी संजय मिना यांनी दि. २ ला नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर केली. त्यावर जर काही हरकती असतील तर त्या ८ जूनपर्यंत लेखी स्वरूपात स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर सदर यादीला (गट-गणांचा मसुदा) अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. पूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेची संख्या ५१ तर पंचायत समिती सदस्यांची संख्या १०२ होती. आता ती जि.प.सदस्यांची संख्या ५७ तर पं.स.सदस्यांची संख्या ११४ झाली आहे.

यवतमाळमध्ये आठ जागांची भर

यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची घोषणा केली. नवीन रचनेत जिल्हा परिषदेच्या आठ तर पंचायत समितीच्या १६ जागांची भर पडली आहे. आता जिल्हा परिषदेत ६१ ऐवजी ६९ तर पंचायत समितीत २२२ ऐवजी १३८ सदस्य निवडून येणार आहे. नवीन रचनेमुळे कहीं खुशी, कहीं गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नवीन गट आणि गणांच्या रचनेत माजी अध्यक्षांना दिलासा मिळाला तर दोन्ही माजी उपाध्यक्षांचे गट गायब झाले आहेत. १६ पैकी आठ तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या १६ जागा वाढल्या आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी गट आणि गणांचा मसुदा प्रसिद्ध केला. हा मसुदा प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदVidarbhaविदर्भElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषद