विषय समितीच्या रिक्त जागेसाठी आज निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:11+5:302021-07-09T04:10:11+5:30
जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या ५९ सदस्य व १४ पंचायत समिती सभापती अशा ७३ सदस्यांना प्रत्येकी एका समितीत घेणे बंधनकारक ...

विषय समितीच्या रिक्त जागेसाठी आज निवडणूक
जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या ५९ सदस्य व १४ पंचायत समिती सभापती अशा ७३ सदस्यांना प्रत्येकी एका समितीत घेणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेमध्ये १० समित्यांवरील ८३ जागांवर सद्यस्थितीत ७८ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यात १४ सदस्यांना प्रत्येकी दोन समित्यांवर स्थान देण्यात आले आहे; परंतु बांधकाम, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बाल कल्याण या समित्यांत प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. यात विशेष समित्यांवर जिल्हा परिषद सदस्यांच्या तीन तसेच दोन पंचायत समिती सभापती अशा पाच जागा रिक्त आहेत. यातील तीन जागा रिक्त ठेवल्या जाणार आहेत. कारण दोन जिल्हा परिषद सदस्य आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. एका महिला सदस्याचे गत काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. या तीनही रिक्त जागांवर अद्याप निवडणूक झालेली नाही. त्यामुळे त्या रिक्तच राहणार आहेत. मोर्शी व चांदूर बाजार येथील पंचायत समिती सभापतीने दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त असलेल्या या दोन जागांवर नव्याने सभापतिपदी म्हणून निवडून आलेल्या सभापतींची वर्णी लागणार आहे. यापूर्वी सभापती ज्या समितीचे सदस्य होते, त्याच समितीवर त्यांना संधी दिली दाट शक्यता आहे. यासाठी ९ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभा विशेष सभा आयोजित केली आहे. या समितीच्या रिक्त जागांसाठी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत चांदूर बाजार व मोर्शी येथील सभापतींना नामांकन दाखल करावयाचे, त्यानंतर अर्जदारांची नावे वाचणे, अर्जाची छाननी करणे, अर्ज मागे घेण्याची संधी देणे आदी प्रक्रिया पार पडल्यानंतर निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.
बॉक्स
अविरोध निवडीची शक्यता
जिल्हा परिषदेच्या विषय समितीमध्ये रिक्त असलेल्या पाचपैकी दोन जागा भरण्यासाठी विशेष सभा होऊ घातली आहे. यामध्ये चांदूर बाजार व मोर्शी पंचायत समितीच्या नवीन सभापतींची विषय समितीवर निवड करावयाची आहे. अशातच यापूर्वीचे सभापती ज्या समितीवर सदस्य म्हणून कार्यरत होते, त्याच समितीत रिक्त जागेवर या सभापतींना संधी देऊन ही निवड प्रक्रिया अविरोध होण्याची दाट शक्यता आहे.