महापौर पदाची निवडणूक ९ ला
By Admin | Updated: September 1, 2014 23:13 IST2014-09-01T23:13:43+5:302014-09-01T23:13:43+5:30
१४ व्या महापौर पदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी विभागीय आयुक्तांनी घेतला असून महापौर पदाचे नामनिर्देशन पत्र ५ सप्टेंबर रोजी भरण्याचा कालावधी प्रशासनाने ठरविला आहे.

महापौर पदाची निवडणूक ९ ला
निर्णय : ५ सप्टेंबर रोजी नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी
अमरावती : १४ व्या महापौर पदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी विभागीय आयुक्तांनी घेतला असून महापौर पदाचे नामनिर्देशन पत्र ५ सप्टेंबर रोजी भरण्याचा कालावधी प्रशासनाने ठरविला आहे.
शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांना बहुमान आहे. विद्यमान महापौर वंदना कंगाले यांचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने याच दिवशी नव्या महापौर पदाची निवडणूक होत आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित असल्याने त्या अनुशंगाने महापालिकेत राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, जनविकास- काँग्रेस, बसपात महापौर पदासाठी इच्छुक महिला सदस्यांची लांबलचक यादी आहे. काँग्रेसमध्ये सुनीता भेले, अर्चना राजगुरे, कांचन ग्रेसपुंजे, शीला बजाज, मालती दाभाडे, अर्चना इंगोले ही नावे महापौरपदासाठी आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये रिना नंदा, जयश्री मोरे, ममता आवारे, वंदना हरणे तर राष्ट्रवादीतून जयश्री मोरय्या, सपना ठाकूर या महापौर पदासाठी शर्यतीत आहेत. राष्ट्रवादीच्या अंतर्गत भांडणाचा लाभ घेता आला तर शिवसेनेतून स्वाती निस्ताणे, सविता लाडेकर, वनिता तायडे आणि भाजपतून मंजुषा जाधव यांना लॉटरी लागण्याचे संकेत आहेत.