६४८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST2021-04-07T04:13:37+5:302021-04-07T04:13:37+5:30
अमरावती : सुरुवातीला कर्जमाफी व नंतर कोरोना संसर्गामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तब्बल सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळी ...

६४८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
अमरावती : सुरुवातीला कर्जमाफी व नंतर कोरोना संसर्गामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तब्बल सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळी पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंत पुन्हा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ६४८ संस्थांचा समावेश आहे. तसे आदेश सहकार विभागाने मंगळवारी जारी केले आहेत.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ (क) अन्वये नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. याच अधिकाराचा वापर करून १८ मार्च २०२०, १७ जून २०२०, २८ सप्टेंबर २०२० च्या आदेशान्वये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत, तर १६ जानेवारी २०२१ व २४ फेब्रुवारी २०२१ च्या आदेशान्वये ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्ग कमी झालेला नसल्याने जनहिताच्या दृष्टीने पुन्हा ६ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असल्याचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी सांगितले.
बॉक्स
या संस्थांना निर्णयाचा लाभ
प्रवर्ग ‘अ’मधील दोन सूतगिरणी, प्रवर्ग ‘ब’मधील सात नागरी पगारदार संस्था, याच वर्गवारीतील विभागस्तरीय सहा पतसंस्था, सेवा सोसायटी व आदिवासी सहकारी संस्था ३८२, पाच जिल्हा/ तालुका खरेदी-विक्री संघ, चार शासकीय अनुदान प्राप्त औद्योगिक संस्था, वसूल भागभांडवल एक कोटींवर असणाऱ्या २३ पतसंस्था, प्रवर्ग (क) नागरी/ कर्मचारी पतसंस्था ११९, प्राथमिक सहकारी ग्राहक भांडार २२, सामुदायिक शेती संस्था ०१, मजूर् सहकारी संस्था १२, औद्योगिक संस्था १२, सुशिक्षित बेरोजगार संस्था ३७, पाणीवापर, उपसा जलसिंचन संस्था ०३ व प्रक्रिया संस्था १०