शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

वयस्क महिलेची १.५३ कोटी रुपयांनी फसवणूक; तब्बल २३० खात्यांत ट्रान्स्फर करून विड्रॉलही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 13:39 IST

Amravati : शेअर मार्केट, क्रिप्टोकरंसी फ्रॉडचे कनेक्शन थेट फिलिपिन्सशी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील एका सिनिअर सिटिझन महिलेची शेअर व क्रिप्टोकरंसीमध्ये तब्बल १.५३ कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. त्या टोळीचा म्होरक्या मोहित भोपाळ (४०) हा मूळ दिल्लीचा असून तो फिलिपिन्स देशात बसून, तेथील नागरिकत्व घेऊन ते नेटवर्क हाताळत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर सायबर पोलिसांनी अमरावती येथील एका तरुणीसह अकोल्याच्या चौघांना अटक केली आहे. ती रक्कम देशभरातील तब्बल २३० खात्यात ट्रान्सफर करून ती विड्रॉल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुरुवारी दिली.

याप्रकरणी दक्षता (२४, रा. अमरावती), शुभम गुलाये (२३, म्हाडा कॉलनी, अकोला), गौरव अग्रवाल (२३, रा. यशोदानगर, कौलखेड, अकोला), नमन डहाके (२३, रा. रिंग रोड, कौलखेड अकोला) व रवी मौर्या (३३, रा. जाजूनगर, अकोला) यांना अकोला व नागपूर येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून विविध बँकेचे चेकबुक, पास बुक, २० एटीएम कार्ड, १७ सीमकार्ड, एसडी कार्ड, रबर स्टॅम्प व सहा मोबाइल जप्त करण्यात आले. त्यांना ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सायबरच्या ठाणेदार कल्याणी हुमने व सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार यांच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली. यातील ७.४५ लाख रुपये गोठविण्यात आले आहेत. पत्रपरिषदेला डीसीपीत्रयी कल्पना बारवकर, गणेश शिंदे व सागर पाटील यांच्यासह क्राइम एसीपी शिवाजीराव बचाटे उपस्थित होते.

अशी होती तक्रार■ येथील एका महिलेने २७ जून रोजी त्याबाबत शहर सायबर पोलिसांत तक्रार नोंदविली होती. आरोपींनी वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून मॅसेज करून शेअर मार्केट तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा देण्याचे आमिष दिले. वियाका एक्स्चेंज नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी गुंतवणूक केली.

टीडीएस भरण्यासाठी ७५ लाख रुपये कर्ज६६ लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर चार कोटी रुपये नफा झाल्याचे महिलेला सांगण्यात आले. मात्र, नफ्याची रक्कम विड्रॉल करायची असेल तर टीडीएस भरावा लागेल, असे आरोपींनी सांगितले. त्यामुळे महिलेने एफडी मोडून व सुमारे ७५ लाख रुपये कर्ज घेऊन ती रक्कम आरोपींकडे ट्रान्सफर केली. मात्र, त्यानंतरही आरोपींनी टाळाटाळ चालविली.

४२ लाख ८२ हजार ८२४ रुपये हे येथील स्थानिक शाखांसह कोटक महिंद्रा बँक, गुजरात, बंधन बैंक, हैदराबाद, फेडरल बँकेसह गुजरात, पंजाब, कर्नाटक, तेलगंणा येथील १४ बँक अकाऊंटमध्ये तर उर्वरित रक्कम ही २१६ बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली. ती अवघ्या दोन दिवसांत विड्रॉलदेखील केली.

ती रक्कम लोकल खात्यात, रवीने बनविली टोळीफिर्यादी महिलेचे ४२.८२ लाख रुपये एसबीआयच्या येथील बँक अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले. ते खाते येथीलच एका मॉलमध्ये काम करणाऱ्या दक्षता नामक २४ वर्षीय तरुणीचे असल्याचे तपासात उघड होताच तिला अटक करण्यात आली. स्वतःचे बँक अकाऊंट मुख्य आरोपींना देऊन त्या अकाऊंटचे डिटेल्स, चेक बुक व एटीएम तिने मुख्य आरोपी मोहितला दिल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी तिला रक्कमदेखील देण्यात आली. स्थानिक स्तरावर रवी मौर्या हा मुख्य आरोपी आहे. त्यानेच येथे टोळी बनविली. 

टॅग्स :share marketशेअर बाजारfraudधोकेबाजीAmravatiअमरावती