आठ तालुके राहणार वंचित!

By Admin | Updated: April 20, 2015 00:28 IST2015-04-20T00:28:10+5:302015-04-20T00:28:10+5:30

राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या जीवित व वित्तहानीसाठी आपादग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय..

Eight talukas will be deprived! | आठ तालुके राहणार वंचित!

आठ तालुके राहणार वंचित!

अवकाळीची मदत : संयुक्त अहवालानुसार सहाच तालुके बाधितगजानन मोहोड ल्ल अमरावती
राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या जीवित व वित्तहानीसाठी आपादग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने १३ एप्रिलला घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना अवकाळीचा तडाखा बसला असताना जिल्हा प्रशासनाच्या अहवालात केवळ आठ तालुक्यांचीच नोंद आहे. त्यामुळे या आठ तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
राज्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे व्यक्ती व जनावरे यांची जीवित हानी, घरांची पडझड, शेतजमिनीचे आणि शेतीपिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. याबाबत ‘विशेष बाब’ म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. अवकाळीमुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतीपिकांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त स्वाक्षरी अहवालात अमरावती, धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव, चांदूररेल्वे, भातकुली तालुक्याची नोंद आहे.

केंद्राच्या परिपत्रकाने जागविली आशा
केंद्र शासनाने ८ एप्रिलला परिपत्रक जारी करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये घसघशीत वाढ केली आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. एप्रिल २०१५ ते २०२० पर्यंतच्या नुकसानीसाठी ‘एसडीआरएफ’ वाढीव अनुदान देण्याची शिफारस केली. यामध्ये फेब्रुवारी व मार्च २०१५ च्या अवकाळी बाधितांचा समावेश करण्याचे निर्देश दिल्याने शेतकऱ्यांना वाढीव मदतीची आशा आहे.

Web Title: Eight talukas will be deprived!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.